आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भडका, महागाईच्या आघाडीवर वाढणार आव्हान

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाच्या (Brent Crude Oil) किमती पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्या आहेत.
Brent Crude Oil
Brent Crude OilDainik Gomantak
Published on
Updated on

Brent Crude Oil: आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती दोन महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर $124 प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. बुधवारी देखील त्याची किंमत प्रति बॅरल 121 डॉलरच्या जवळ होती. त्यामुळे सुमारे 85% तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारताचे तेल आयात बिल पुन्हा वाढत असून महागाईच्या आघाडीवर आव्हान मोठे होत आहे. (Rising Brent crude oil prices in the international oil market are likely to push up further inflation in the country)

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाच्या वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियनच्या (European Union) सदस्य राष्ट्रांनी रशियाकडून दोन तृतीयांशहून अधिक कच्चे तेल आयात करण्यावर बंदी घातली आहे. यासह, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत मंगळवारी प्रति बॅरल $ 124 वर पोहोचली, जी गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक आहे.

Brent Crude Oil
पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

दुसरीकडे, पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 31 मे 2022 रोजी कच्च्या तेलाच्या भारतीय बास्केटची किंमत प्रति बॅरल 118.31 रुपये झाली. यासह, मे महिन्यात कच्च्या तेलाच्या भारतीय बास्केटची सरासरी किंमत प्रति बॅरल 109.51 वर पोहोचली. एप्रिलमध्ये कच्च्या तेलाच्या भारतीय बास्केटची सरासरी किंमत प्रति बॅरल 102.97 होती.

साहजिकच, वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारत सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मंगळवारी, 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत GDP वाढीचा दर 4.1% वर घसरला. आता महागड्या कच्च्या तेलामुळे भारत सरकारची चिंता वाढत आहे. मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी म्हटले आहे की, ब्रेंट क्रूड ऑइलच्या भारतीय बास्केटची किंमत पुन्हा $120 च्या दिशेने सरकत आहे. आयात किंमतीचा दबाव वाढत असल्याने देशातील महागाई उच्च राहील.

Brent Crude Oil
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सुधारणा

शिवाय, तेल अर्थतज्ज्ञ किरीट पारीख यांच्या मते, रशिया-युक्रेन युद्ध संपण्याची शक्यता नाही. येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चे तेल आणखी महाग होऊन प्रति बॅरल 130 ते 140 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. किरीट पारीख यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारताला इराण आणि रशियाकडून स्वस्त दरात मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करण्याचे प्रयत्न अधिक तीव्र करावे लागतील.

किरीट पारीख म्हणाले, "भारतासाठी (India) ही अत्यंत चिंतेची बाब आहे. युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 130 ते 140 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. भारताला पूर्वीच्या वस्तू विनिमय पद्धतीनुसार इराणकडून (Iran) कच्चे तेल मिळेल. परंतु वाटाघाटी व्हायला हव्यात. रशियाकडून तेल आयात करण्यास सुरुवात केली जाईल. गेल्या महिन्यात भारत सरकार आणि काही राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रित करण्यासाठी त्यांच्यावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. मात्र असे असूनही पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा वाटा अजूनही जास्त आहे.''

Brent Crude Oil
कच्च्या तेलाच्या किमतींनी वाढवली चिंता, रिझर्व्ह बँकेने उचलले मोठे पाऊल

तसेच, बुधवारी इंडियन ऑइलने एक अहवाल प्रसिद्ध केला की, 1 जून रोजी दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 / लीटर होती. यामध्ये भारत सरकारच्या उत्पादन शुल्काचा वाटा 19.90 रुपये प्रति लिटर आणि दिल्ली सरकारच्या व्हॅटचा वाटा 15.71 रुपये प्रति लिटर इतका होता. दिल्लीत प्रति लिटर पेट्रोलवरील कराचा वाटा रु.35.61 प्रति लिटर म्हणजेच 36.81% इतका होता. साहजिकच, महागाईच्या आघाडीवर भारत सरकारसमोरील आव्हान मोठे होत चालले आहे. हाच कल असाच सुरु राहिला, तर परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारला वेगळे धोरण आखावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com