Airtel Plans Price Hike: जिओनंतर आता एअरटेलने आपल्या मोबाईल प्लॅन्सच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. जिओने जवळपास अडीच वर्षांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. एअरटेलने आपले प्लॅन्स 600 रुपयांनी महाग केले आहेत, तर Jio च्या प्लॅनच्या किमती 27 टक्क्यांनी वाढल्या आहेत. वाढलेल्या किमती पुढील महिन्यात 3 जुलैपासून लागू होतील. एअरटेलच्या या निर्णयानंतर यूजर्संना मोठा फटका बसला आहे. कारण देशातील दोन्ही आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी एकापाठोपाठ आपल्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. याशिवाय, डेली डेटा प्लॅन आणि डेटा ॲड ऑन प्लॅनच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत.
अनलिमिटेड वॉयस प्लॅन्स: टॅरिफ वाढल्यानंतर, आता तुम्हाला एअरटेलच्या 179 रुपयांच्या प्लॅनसाठी 199 रुपये, 455 रुपयांच्या प्लॅनसाठी 509 रुपये आणि 1799 रुपयांच्या प्लॅनसाठी 1999 रुपये द्यावे लागतील.
डेली डेटा प्लॅन: 265 च्या प्लॅनसाठी आता 299 रुपये द्यावे लागतील. तर 299 च्या प्लॅनसाठी 349 रुपये. 359 प्लॅनसाठी 409 रुपये. 399 च्या प्लॅनसाठी 449 रुपये. याशिवाय, 479 रुपयांच्या प्लॅनसाठी 579 रुपये, 579 च्या प्लॅनसाठी 649 रुपये, 719 रुपयांच्या प्लॅनसाठी 859 रुपये, 839 रुपयांच्या प्लॅनसाठी 979 रुपये आणि 2999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनसाठी 3599 रुपये द्यावे लागतील.
Airtel Data Plans: Airtel च्या सर्वात स्वस्त डेटा प्लॅनची किंमत 19 रुपये होती, पण आता या प्लॅनसाठी तुम्हाला 22 रुपये अधिक मोजावे लागतील, 29 रुपयांच्या प्लॅनसाठी तुम्हाला 33 रुपये मोजावे लागतील तर 65 रुपयांच्या प्लॅनसाठी तुम्हाला रुपये 77 द्यावे लागतील.
एअरटेलच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची जुनी किंमत 399 रुपये होती, पण आता तुम्हाला तोच प्लॅन 449 रुपयांमध्ये मिळेल. 499 रुपयांच्या प्लॅनसाठी तुम्हाला 549 रुपये द्यावे लागतील.
आता Airtel पोस्टपेड वापरकर्त्यांना 599 रुपयांच्या प्लॅनसाठी 1199 रुपये आणि 999 रुपयांच्या प्लॅनसाठी 699 रुपये खर्च करावे लागतील.
रिलायन्स जिओप्रमाणेच एअरटेलनेही दरवाढीची घोषणा केली आहे. एअरटेलच्या मते, हा निर्णय घेण्यामागचे कारण म्हणजे प्रति यूजर्स सरासरी महसूल (ARPU) वाढवणे. एअरटेलने म्हटले आहे की, भारतातील दूरसंचार कंपन्यांसाठी आर्थिकदृष्ट्या चांगले व्यवसाय मॉडेल राखण्यासाठी, प्रति यूजर्स सरासरी मोबाइल महसूल (ARPU) 300 रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.