लॅपटॉपसाठी Reliance Jioची मोठी ऑफर! 100GB डेटा एका वर्षासाठी मोफत

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर जाहीर केली आहे.
Reliance Jio
Reliance JioDainik Gomantak
Published on
Updated on

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने सिम कार्ड सपोर्ट देणार्‍या स्मार्ट LTE लॅपटॉपसाठी Jio ऑफरची घोषणा केली आहे. कंपनी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय HP स्मार्ट सिम लॅपटॉपवर 100GB हाय स्पीड डेटा आणि Jio Digital Life फायदे देत आहे.

ही ऑफर केवळ निवडक HP लॅपटॉपच्या खरेदीवर नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. Jio कडून लॅपटॉपसह नवीन Jio सिम कार्ड घेतल्यास, तुम्हाला कोणतेही पैसे न भरता 365 दिवसांच्या वैधतेसह 100 GB डेटा मोफत मिळणार आहे. कंपनीच्या या ऑफरचा लाभ HP लॅपटॉप मॉडेल HP 14ef1003tu आणि HP 1ef1002tu वर मिळणार आहे.

Reliance Jio
Edible Oil Price Reduced: अदानी विल्मरने खाद्यतेलात केली 30 रुपयांनी कपात, जाणून घ्या नवे दर

जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप ऑफर रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून किंवा ऑफलाइन रिलायन्स डिजिटल जिओमार्टद्वारे खरेदी केली जाऊ शकते. एचपीच्या मॉडेलच्या खरेदीवर अतिरिक्त पैसे न देता नवीन जिओ सिम दिले जाऊ शकते. ग्राहकांचा 100 GB डेटा संपताच, त्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64Kbps इतका कमी होईल.

तुम्ही ऑफलाइन खरेदी करता तेव्हा अशा ऑफर अॅक्टिव करा

रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून नवीन HP स्मार्ट सिम लॅपटॉप खरेदी करा आणि स्टोअर एक्झिक्युटिव्हला FRC 505 हे ऑफर अॅक्टिव करण्यास सांगा.

यानंतर, तुमच्या कागदपत्रांसाठी ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा द्या.

इंटरनेट पॅक यशस्वीरित्या अॅक्टिव केल्यानंतर, HP स्मार्ट सिम लॅपटॉपमध्ये सिम इन्सर्ट सेट करा.

Reliance Jio
तरुणाईची धडधड वाढवण्यासाठी लवकरच लॉन्च होणार Yamaha RX100

सर्वप्रथम तुम्ही रिलायन्स डिजिटल किंवा jio mart.com च्या अधिकृत वेबसाइटवरून नवीन HP स्मार्ट सेल लॅपटॉप खरेदी करा.

लॅपटॉप डिलिव्हरी झाल्यानंतर, लॅपटॉप जवळच्या रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये घेवून घ्या.

-त्यानंतर स्टोअर एक्झिक्युटिव्हला 100GB डेटा ऑफर अॅक्टिव करण्यास सांगा म्हणजेच FRC 505

- त्यानंतर कागदपत्रांसाठी आवश्यक ओळख पुरावा आणि पत्ता पुरावा द्या.

ऑफर अॅक्टिव झाल्यानंतर, तुम्ही हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com