जिओचा होळी धमाका, दोन नवीन प्लॅन लॉन्च

म्हणून व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळत नाहीत
reliance jio launched two new work from home plans with 365 days validity
reliance jio launched two new work from home plans with 365 days validityDainik Gomantak
Published on
Updated on

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना भेटवस्तू देत दोन नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. कंपनीने वर्क फ्रॉम होम आणि प्रीपेड प्लॅन या दोन्ही योजना सादर केल्या आहेत. त्यांची किंमत 2,878 रुपये आणि 2,998 रुपये आहे. विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी 2 GB आणि 2.5 GB डेटा मिळणार आहे. दोन्ही योजना कंपनीच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आल्या आहेत.

जिओचा WFH प्लॅन

रिलायन्स (Reliance) जिओचा 2878 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो. म्हणजेच या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 730GB डेटा मिळेल. एकदा डेटा मर्यादा संपली की, स्पीड 64Kbps कमी होणार. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लान असल्याने, यात व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळत नाहीत.

reliance jio launched two new work from home plans with 365 days validity
रेल्वे स्टेशनवरच महिलेची पोलिसाला चपलेने मारहाण, व्हिडीओ व्हायरल

जिओचा WFH प्लॅन

जिओच्या (jio) नवीन 2998 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन, (plan) वापरकर्त्यांना 365 दिवसांसाठी दररोज 2.5GB डेटा देत आहे. म्हणजेच एका वर्षात तुम्हाला एकूण 912.5GB डेटा मिळेल. एकदा डेटा मर्यादा संपली की, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होणार. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लान असल्याने, यात व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळत नाहीत.

बाकी जिओ वर्क फ्रॉम होम प्लॅन

कंपनीकडे रु. 181, रु. 241 आणि रु. 301 चे आणखी 3 वर्क फ्रॉम होम प्लॅन आहेत. हे तिन्ही प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतात. 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 जीबी, 241 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40 जीबी आणि 301 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 50 जीबी डेटा दिला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com