Reliance: आणखी एक कंपनी खरेदी करणार रिलायन्स, दक्षिणेत स्थान भक्कम करणार

रिलायन्सला आता दक्षिणेतील मार्केट काबिज करायचे आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी Dainik Gomantak
Published on
Updated on

देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक असलेली रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल कंपनी आपला व्यवसाय वाढवणार आहे. यासाठी तो दक्षिणेतील दिग्गज उद्योगपती व्हीए अजमल यांची कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहे. दक्षिण बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी रिलायन्स समूह व्हीए अजमल यांची कंपनी विकत घेणार असल्याचे बोलले जात आहे. आपला व्यावसाय वाढविण्यासाठी रिलायन्स नेहमीच प्रयत्नशील असते, रिलायन्सला आता दक्षिणेतील मार्केट काबिज करायचे आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी
YouTube Videos Blocked: देशाविरोधात विष पसरवणारे YouTube चॅनेल ब्लॉक

याआधीही रिलायन्सच्या रिटेल कंपनीने दक्षिणेतील तीन कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हीए अजमल दक्षिणेतील बड्या उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट आहेत. अजमल यांची 800 कोटींची कमाई करणारी कंपनी बिस्मी याची लवकरच विक्री होणार आहे. घरगुती, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने आणि किराणा मालाच्या क्षेत्रात मोठे नाव कमावणारे व्हीए अजमल हे बिस्मीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. बिस्मीने केरळमधील मोठी बाजारपेठ काबीज केली आहे.

केरळमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी, रिलायन्सची उपकंपनी रिलायन्स रिटेल, बिस्मी विकत घेण्याची तयारीत आहे. यापूर्वी दोन्ही कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांमध्ये सौदेबाजीबाबत बैठकही झाली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

बिस्मी केरळमधील अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स आणि किराणा किरकोळ विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. बिस्मीचे केरळमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि हायपरमार्केट स्वरूपात 30 मोठे स्टोअर्स आहेत. या खरेदीच्या माध्यमातून रिलायन्सला आपले रिटेल उत्पादन लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. कंपनीची खरेदी दिवाळीपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी
Fuel Price: मोठी खूशखबर, तेलाच्या किमतीत मोठी घसरण; जाणून घ्या नव्या किमती

दक्षिणेतील बाजारपेठ काबीज करण्यासाठी रिलायन्स रिटेलने आधीच तीन कंपन्या खरेदी केल्या आहेत. याआधी रिलायन्सने तामिळनाडूतील श्री कन्नन डिपार्टमेंटल स्टोअर कंपनीला 152 कोटींमध्ये विकत घेतली. तर, रिलायन्सने कलानिकेतन देखील विकत घेतले आहे, जे दक्षिणेतील अग्रगण्य साडी आणि पोशाख विक्रेते म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स रिटेलने दक्षिणेतील मोठी किराणा कंपनी जयसूर्या रिटेल देखील विकत घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com