
भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत Realme ही एक लोकप्रिय कंपनी आहे. कमी बजेट सेगमेंट आणि मिड-रेंज सेगमेंटमध्ये Realme चे स्मार्टफोन खूप लोकप्रिय आहेत. जर तुम्ही Realme चे चाहते असाल आणि नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Realme भारतात एक नवीन स्मार्टफोन Realme Narzo 80 Lite 5G लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कमी किमतीत दमदार फीचर्स पाहायला मिळतील.
दरम्यान, Realme चा हा आगामी स्मार्टफोन Narzo 80 मालिकेतील तिसरा स्मार्टफोन असेल. कंपनीने या मालिकेतील Realme Narzo 80 Pro 5G आणि Realme Narzo 80x 5G आधीच सादर केले आहेत. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर तुम्ही या स्मार्टफोनसाठी (Smartphones) आणखी काही दिवस वाट पाहू शकता.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने Realme Narzo 80 Lite 5G साठी डेडिकेटेड माइक्रोसाइट लाईव्ह केली आहे. Amazon च्या मायक्रोसाइटवरुन त्याच्या भारतात लॉन्चची पुष्टी देखील करण्यात आली आहे. कंपनी लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लवकरच लॉन्च करेल. सध्या कंपनीने या धमाकेदार स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर केलेली नाही.
Realme Narzo 80 Lite 5G मध्ये कंपनीला 6.7-इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो.
हा डिस्प्ले फुल एचडी प्लस AMOLED पॅनेलसह 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करु शकतो.
स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज पर्याय असू शकतो.
स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh ची मोठी बॅटरी मिळू शकते. याशिवाय, रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील मिळू शकतो.
परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.