रिझर्व्ह बँकेचा मोठा धक्का, मणप्पुरम फायनान्सला ठोठावला 17 लाखांचा दंड

RBI Fine on Manappuram Finance : KYC मार्गदर्शक तत्त्वांसह प्रीपेड पेमेंट उत्पादनांशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 17 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
RBI slaps Rs 17 lakh fine on Manappuram Finance
RBI slaps Rs 17 lakh fine on Manappuram Finance Dainik Gomantak
Published on
Updated on

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) मणप्पुरम फायनान्सला KYC मार्गदर्शक तत्त्वांसह प्रीपेड पेमेंट उत्पादनांशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 17 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अॅक्ट, 2007 च्या कलम 30 मध्ये असलेल्या अधिकारांनुसार हा दंड ठोठावण्यात आला आहे. (RBI slaps Rs 17 lakh fine on Manappuram Finance)

RBI slaps Rs 17 lakh fine on Manappuram Finance
BIS Recruitment 2022| BIS मध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू; 10वी ते PG पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

प्रीपेड पेमेंट उत्पादने (PPIs) जारी करणे आणि ऑपरेट करण्याच्या सूचनांसह KYC नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कंपनीचे उत्तर आणि सुनावणीची संधी दिल्यानंतर मध्यवर्ती बँकेने हा दंड आकारण्याचा निर्णय घेतला.

स्पाइसजेटचे प्रवर्तक अजय सिंग यांनी हेल्थकेअर स्टार्टअप Flebo.in मध्ये खाजगी क्षमतेने गुंतवणूक केली आहे. कंपनीने सोमवारी एका निवेदनात ही माहिती दिली. Flebo.in आरोग्य तपासणी प्रयोगशाळांना नमुना संकलन सेवा पुरवते. वैद्यकीय प्रयोगशाळांना घरी जाऊन रुग्णांचे नमुने गोळा करण्यासाठी स्वतःचे एजंट नेमण्याची गरज भासणार नाही. हे या प्रयोगशाळांना त्यांच्या स्थानिक क्षेत्राबाहेरील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करेल. Flebo.in मध्ये 100 प्रशिक्षित लोक असतात जे रक्त आणि इतर नमुने गोळा करण्यासाठी ग्राहकांच्या घरी जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com