Banking Fraud Cases: अनेक वेळा लोकांना बँकेच्या नावाने बनावट कॉल येतात, त्यानंतर त्यांच्या खात्यातून लाखो रुपये गायब होतात. सध्या देशभरात बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असून खुद्द रिझर्व्ह बँकेने याबाबत माहिती दिली आहे.
आरबीआयच्या वतीने एक अहवाल जारी करुन हे सांगण्यात आले आहे. यासोबतच बँक खाती असलेल्या ग्राहकांनी अशा बनावट कॉल्स आणि फसवणुकीपासून सावध राहावे, असे आरबीआयने म्हटले आहे.
2022-23 मध्ये बँकिंग क्षेत्रातील फसवणुकीची प्रकरणे 13,530 पर्यंत वाढली आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मंगळवारी यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली. या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गुंतलेली एकूण रक्कम 30,252 कोटी रुपये होती, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्मी आहे.
आरबीआयच्या (RBI) 2022-23 च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, व्हॉल्यूमच्या बाबतीत, फसवणूक प्रामुख्याने डिजिटल पेमेंट्स (कार्ड/इंटरनेट) च्या श्रेणीमध्ये झाली. मूल्याच्या संदर्भात, जास्तीत जास्त फसवणूक मुख्यत्वे लोन पोर्टफोलिओ (अॅडव्हान्स श्रेणी) मध्ये नोंदवली गेली.
वार्षिक अहवालानुसार, 2021-22 मध्ये एकूण 9,097 फसवणूक प्रकरणे उघडकीस आली, ज्यात 59,819 कोटी रुपयांचा समावेश आहे. यापूर्वी, 2020-21 मध्ये 7,338 फसवणूक प्रकरणांमध्ये गुंतलेली एकूण रक्कम 1,32,389 कोटी रुपये होती.
"गेल्या तीन वर्षांतील बँक (Bank) फसवणुकीच्या प्रकरणांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, संख्येच्या बाबतीत, खाजगी क्षेत्रातील बँकांकडून अधिक फसवणूक नोंदवली गेली आहे.
तर मूल्याच्या बाबतीत, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून अधिक फसवणूक झाली आहे," असे अहवालात म्हटले आहे. आकडेवारीमध्ये तीन वर्षात नोंदवलेल्या 1 लाख आणि त्याहून अधिक रकमेच्या फसवणुकीच्या प्रकरणांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.