Bank License Cancelled
Bank License CancelledDainik Gomantak

RBI ने या बँकेचा रद्द केला परवाना; कारण आले समोर

रिझर्व्ह बँकेने बागलकोट, कर्नाटकातील मुधोळ सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on

रिझर्व्ह बँकेने कर्नाटकातील एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने बागलकोट, कर्नाटकातील मुधोळ सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईनंतर खातेदार पैसे काढू आणि जमा करू शकणार नाहीत.

रिझर्व्ह बँकेने मुधोळ को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यामागे बँकेकडे पुरेसे पैसे नसल्याचे कारण दिले आहे. त्यामुळे बँकेचे उत्पन्न जवळपास संपले आहे. अशा परिस्थितीत बँकेची आर्थिक स्थिती पाहता आरबीआयने बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कालच मध्यवर्ती बँकेने मुधोळ सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या ग्राहकांच्या खात्यात पैसे पडले आहेत त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. DICGC (डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) अंतर्गत ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केलेल्या पैशांवर बीना सुविधा देण्याचे काम केले जाते.

DICGC अंतर्गत, ग्राहकांना विविध प्रकारच्या योजनांचे लाभ मिळतात. यामध्ये तुम्हाला बचत खाते, एफडी योजना, चालू खाते इत्यादी योजनांवर विम्याची सुविधा मिळेल. या विमा योजनेचे फायदे ही विमा सुविधा व्यापारी बँकांमध्ये तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या बँकांमध्ये उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com