2000 Note: 2000 च्या नोटांबाबत RBI कडून मोठी अपडेट, अजूनही 5817 कोटी रुपयांच्या नोटा बाजारात

RBI 2000 Note Update: देशभरात पुन्हा एकदा 2000 रुपयांच्या नोटांची चर्चा सुरु झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकतेच नवे आकडे जारी केले.
2000 Note News
2000 NoteDainik Gomantak
Published on
Updated on

RBI 2000 Note Update: देशभरात पुन्हा एकदा 2000 रुपयांच्या नोटांची चर्चा सुरु झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच नवे आकडे जारी केले, ज्यामुळे एक मोठा खुलासा झाला. नोटाबंदीसारखी प्रक्रिया सुरु होऊन जवळपास दीड वर्ष उलटल्यानंतरही बाजारात अजूनही 5817 कोटी रुपये मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा परत आलेल्या नाहीत. बहुतांश लोकांनी या नोटा पूर्णपणे चलनातून बाहेर पडल्याचे मानले असतानाच आरबीआयने ही माहिती सार्वजनिक केली.

आरबीआयने शनिवारी (1 नोव्हेंबर) जारी केलेल्या एका निवेदनानुसार, 19 मे 2023 रोजी जेव्हा 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा करण्यात आली होती, तेव्हा त्यांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये इतके होते. आता हे मूल्य मोठ्या प्रमाणात कमी होऊन केवळ 5817 कोटी रुपये इतके राहिले. याचा अर्थ, आरबीआयच्या आकडेवारीनुसार, 98.37% 2000 रुपयांच्या नोटा बँकिंग प्रणालीमध्ये परत आल्या आहेत.

2000 Note News
2000 च्या नोटा चलनातून बाद केल्याचा फायदा की तोटा? RBI ने शेअर केला महत्त्वपूर्ण डेटा

2000 ची नोट आजही वैध

आरबीआयने (RBI) यावर स्पष्टीकरण दिले की, 2000 रुपयांच्या नोटा आजही कायदेशीर मुद्रा (Legal Tender) आहेत, म्हणजेच त्या कोणत्याही व्यवहारात स्वीकारल्या जाऊ शकतात. तथापि, या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे आणि बँकांनी त्या पुन्हा जारी करणे थांबवले आहे. केंद्रीय बँकेने सांगितले की, 19 मे 2023 पासून आरबीआयच्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये या नोटा जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.

9 ऑक्टोबर 2023 पासून जनतेसाठी ही सुविधा आणखी सोपी करण्यात आली. नागरिक आता इंडिया पोस्टच्या माध्यमातूनही आपल्या 2000 रुपयांच्या नोटा कोणत्याही आरबीआय कार्यालयात पाठवून त्या आपल्या बँक खात्यात जमा करु शकतात. आरबीआयची ही प्रादेशिक कार्यालये अहमदाबाद, बंगळुरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुरम येथे स्थित आहेत.

2000 Note News
RBI Governor Shaktikant Das on Economy: 'वाढत्या महागाईपासून मिळणार दिलासा, अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार'; RBI गव्हर्नरांचा विश्वास

5817 कोटींच्या नोटा कुठे आहेत?

बाजारात परत न आलेल्या 5817 कोटी रुपयांच्या नोटा कुठे आहेत, याबद्दल आरबीआयने कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नाही, मात्र ते वेळोवेळी नोटा परत येण्याच्या स्थितीबद्दल माहिती देत राहतील असे सांगितले. तज्ज्ञांच्या मते, काही नोटा अजूनही ग्रामीण भागांत किंवा रोखीवर आधारित व्यवसायावर करणाऱ्या लोकांकडे असू शकतात. तसेच, काही लोक या नोटांना संग्रहीत वस्तू म्हणून जपून ठेवत असण्याचीही शक्यता आहे. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असली तरी, अजूनही मोठ्या मूल्याच्या नोटा बाजारात असल्याचे आरबीआयच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com