नियम न पाळणाऱ्या बँकांना आरबीआयचा 112.50 लाख रुपयांचा दंड

या बँकांनी लादलेल्या दंडासंदर्भात आरबीआयने सांगितले की नियामक पालनातील कमतरतेच्या आधारे ही दंड आकारणी करण्यात आली आहे

RBI fines banks Rs 112.50 lakh for non-compliance
RBI fines banks Rs 112.50 lakh for non-complianceDainik Gomantak

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चार सहकारी बँकांना( Cooperative Banks) दंड ठोठावला आहे. देशातील बऱ्याच बँका आरबीआयने दिलेल्या अनेक नियमांचं(Rules & Regulation) पालन न करताना दिसत आहेत त्याचमुळे आरबीआयने आता अशा बँकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. मंगळवारी आरबीआयने हैदराबादस्थित आंध्र प्रदेश महेश सहकारी अर्बन बँक तसेच आणखीन चार सहकारी बँकांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 112.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे .

तसेच अहमदाबाद मर्केंटाईल सहकारी बँकेला 62.50 लाखांचा दंड तर याशिवाय मुंबईच्या एसव्हीसी सहकारी बँकेला 37.50 लाख आणि मुंबईच्या सारस्वत सहकारी बँकेला 25 लाखांचा दंड ठोठावला आहे.


RBI fines banks Rs 112.50 lakh for non-compliance
Covid-19: केरळ सरकारने बिकट परिस्थितीत बदलला अंत्यसंस्काराचा प्रोटोकॉल

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 'ठेवीवरील व्याज दर' आणि 'तुमचा ग्राहक जाणून घ्या' अशा अनेक आरबीआयने घालून दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यामुळे आंध्र प्रदेश महेश सहकारी अर्बन बँकेला हा दंड आकारण्यात आला असून अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बॅंकेला 'ठेवीवरील व्याज दर' या

निर्देशातील निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे.

यावेळी आरबीआयकडून 'या बँकांनी ठेवीवरील व्याज दर आणि फसवणूक देखरेख व अहवाल देणारी यंत्रणा,अशा आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे पालन न करणे तसेच ठेवीवरील व्याज दर आणि ठेव खाती देखभाल यावरील सूचनांचे पालन न केल्याबद्दल या बँकांना दड ठोठावण्यात आला आहे.' असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

तसेच या बँकांनी लादलेल्या दंडासंदर्भात आरबीआयने सांगितले की नियामक पालनातील कमतरतेच्या आधारे ही दंड आकारणी करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com