RBI Penalty on L&T Company: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय सध्या वेगळ्याच मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. बँकांवर सातत्याने कडक कारवाई केली जात आहे.
बँक ऑफ बडोदा, ICICI आणि कोटक बँकेनंतर आता पुन्हा RBI ने कारवाई केली असून L&T FINANCE HOLDINGS LIMITED वर ही कारवाई करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एलएनटीला 2.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, ज्यामध्ये कंपनीने कर्ज देताना अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे.
आरबीआयच्या (RBI) म्हणण्यानुसार, एलएनटीने कर्ज देताना ग्राहकांच्या ई-केवायसीबाबत अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे कंपनीला अडीच कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
याशिवाय, कर्जवसुलीही योग्य पद्धतीने झाली नसल्याचे आढळून आले आहे. तसेच, यासंबंधीचे नियम ग्राहकांना सांगण्यात आले नाहीत. त्याचबरोबर, कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आली.
याआधी आरबीआयने बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आणि आयसीआयसीआय आणि कोटक बँकेच्या अॅपवरही कडक कारवाई केली होती. बँक ऑफ इंडियाच्या मोबाईल अॅपवर बंदी घालण्यात आली होती.
नवीन ग्राहकांबाबत आयसीआयसीआय आणि कोटक बँकेला 16 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आता येत्या काळात कोणत्या बँकेवर कारवाई होणार हे पाहणे बाकी आहे, कारण नियमांशी खेळणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे.
आत्तापर्यंत, आरबीआय सुमारे 20 बँकांवर लक्ष ठेवून आहे. ज्यांची कागदपत्रे तपासली जात आहेत. काही त्रुटी आढळून आल्यास पुढील कारवाई केली जाईल. ज्याबद्दल लवकरच सांगितले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.