Ration Card: मोफत राशन घेणाऱ्यांना मोठा झटका, सरकार आता गहू वाटप करणार नाही!

Free Ration Scheme: केंद्र सरकारकडून करोडो कार्डधारकांना मोफत राशन (Ration Card Update) ची सुविधा दिली जात आहे.
Ration Card Holder
Ration Card HolderDainik Gomantak
Published on
Updated on

Free Ration Scheme: केंद्र सरकारकडून करोडो कार्डधारकांना मोफत राशन (Ration Card Update) ची सुविधा दिली जात आहे. तुम्हीही मोफत राशन घेत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी येत आहे. आतापासून गहू मिळणे बंद होईल का...? सध्या केंद्र सरकारच्या योजनांबाबत अनेक प्रकारच्या फेक न्यूज पाहायला मिळत आहेत.

कार्डधारकांना गहू मिळणार नाही

नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार 1 मार्चनंतर राशनकार्डधारकांना गहू देणार नसल्याचा दावा केला जात आहे. आजकाल सरकार (Government) कार्डधारकांना मोफत राशनमध्ये गहू आणि तांदूळ देत आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये मीठ आणि साखरही दिली जात आहे.

Ration Card Holder
Ration Card: बाईकस्वारांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, तुम्हीही आनंदाने माराल उड्या

पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'टेक्निकल ब्लॉग' नावाच्या #Youtube चॅनलच्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, 1 मार्च 2023 पासून राशनकार्डधारकांना गहू मिळणे बंद होईल. हा व्हिडिओ बनावट आहे. भारत (India) सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

फेक मेसेज कोणाशीही शेअर करु नका

केंद्र सरकारने पुढे म्हटले आहे की, असे मेसेज कोणाशीही शेअर करु नयेत. यासोबतच तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरच संपर्क साधावा.

Ration Card Holder
Ration Card: मोफत राशन घेणाऱ्यांना झटका, सरकारने केली मोठी कारवाई; या लोकांसाठी...

तुम्ही व्हायरल मेसेजची फॅक्ट चेक करु शकता

अशा फेक न्यूजपासून दूर राहा आणि या बातम्या कुणालाही शेअर करु नका, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तूर्तास अशा बातम्या फॉरवर्ड करु नका. तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या मोबाईल क्रमांक 918799711259 किंवा socialmedia@pib.gov.in वर मेल करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com