'बिग बुल' आता विमान क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीच्या तयारीत

राकेश झुनझुनवाला यांची नव्या विमान कंपनीत गुंतवणूक करण्याची योजना आहे.
Rakesh Jhunjhunwala will invest a big amount in Airline Sector
Rakesh Jhunjhunwala will invest a big amount in Airline Sector Dainik Gomantak
Published on
Updated on

देशातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh JhunJhunwala), ज्यांना बिग बुल(Big Bull) म्हणून ओळखले जाते ते आता विमान क्षेत्रातील (Air Line Sector) एक मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, काही विमाने कमी भाड्याने घेऊन नव्या विमान कंपनीत गुंतवणूक करण्याची त्यांची योजना आहे. त्यासाठी त्यांनी प्राथमिक चर्चा केली आहे. या उपक्रमात ते 35 दशलक्ष डॉलर्स किंवा सुमारे 260.7 कोटी रुपये गुंतवू शकतात .

विमान उड्डाण उद्योगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळाने राकेश झुंझुनवाला आणि परदेशी गुंतवणूकदाराशी यासंदर्भात प्राथमिक चर्चा केली आहे. या विमान कंपनीचे नाव 'आकाश' असू शकते. विमान वाहतूक मंत्रालयाकडे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज केला आहे. जर हा प्रस्ताव पुढे गेला तर राकेश झुनझुनवाला यांना नवीन कंपनीत सुमारे 40 टक्के इक्विटी मिळेल.

Rakesh Jhunjhunwala will invest a big amount in Airline Sector
Share Market: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मार्केट तेजीत

नवीन एअरलाइन्स बनविण्यातील व्यावसायिकांच्या पथकात प्रवीण अय्यर, जेटचे माजी उपाध्यक्ष आणि गोएअरचे माजी सीओओ आणि गोएअरचे महसूल व्यवस्थापन प्रमुख अरविंद श्रीनिवासन यांचा समावेश आहे. उद्योग मंत्रालयाने सांगितले की, विमान वाहतूक मंत्रालयाची एनओसी ही पहिली पायरी आहे. निधी गोळा करण्यासाठी, कार्यसंघाकडे मजबूत व्यवसाय योजना असणे आवश्यक आहे. हे सर्व ते किती पैसे उभे करण्यास सक्षम आहेत यावर अवलंबून आहे. पुढील वर्षाच्या मध्यात विमानसेवा सुरू करण्याची योजना केली जात आहे.

राकेश झुंझुनवाला हे देशातील सर्वात मोठी वैयक्तिक गुंतवणूकदारांपैकी एक आहेत या अगोदरही त्यांनी एअरलाइन्स उद्योगात लहान परंतु यशस्वी डाव खेळला आहे. त्यांनी स्पाइसजेटमध्ये 1 टक्क्यांहून अधिक भागभांडवल ठेवले आहे . यासह, विस्कळीत झालेल्या जेट एअरवेजमध्येही त्यांची जवळपास 1 टक्के भागीदारी होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com