बनारस रेल्वे इंजिन फॅक्टरी वाराणसीने 45 व्या बॅच अॅक्ट ऍप्रेंटिसने रेल्वे भरतीची घोषणा केली आहे. या अंतर्गत विविध ट्रेंडसाठी शिकाऊ उमेदवारांच्या 374 पदांची भरती करण्यात येणार आहे. ही पदभरती फक्त ITI पास आणि 10 वी पास असणाऱ्या तरुणांसाठी करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम तारीख 26 एप्रिल आहे. तुम्ही ऑनलाइनद्वारे अर्ज करू शकता. यासाठी blw.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावे.
* ITI पदासाठी शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने 10 वी 50 % गुणासह उतीर्ण असावे आणि संबंधित ट्रेंडमधील ITI प्रमाणपत्र असावे.
* ITI नसलेल्या पदांसाठी
उमेदवाराने केवळ 10 वी 50 % गुणासह उतीर्ण असावे
* ITI नसलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा
* उमेदवाराचे 15 वर्षे ते 22 वर्षे वय असावे.
* SC आणि ST उमेदवारांना वयात पाच वर्षे आणि OBC साठी तीन वर्षांची सूट दिली जाईल.
* उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्यांना कोणतेही महत्त्व दिले जाणार नाही.
* निवड प्रक्रिया
या पदांसाठी निवड करताना कोणतेही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. 10 वी च्या गुणावर आधारित उमेदवारांची निवड केली जाणार आहे.दोन उमेदवारांना समान गुण मिळाल्यास, अधिक वय असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
* अर्ज फी
* सामान्य, OBC आणि EWS असणाऱ्या उमेदवाराना 100 रुपये भरावे लागेल.
* SC, ST आणि दिव्यांग असणाऱ्या उमेदवारांना फी नसणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.