Indian Railways, Vande Bharat Express: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुरी-हावडा दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत (Howrah-Puri Vande Bharat Express) बाबत केंद्र सरकार (Central Government) कटिबद्ध असल्याचे सांगत, वंदे भारतच्या भविष्याबाबत नवे संकेत दिले आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे डिझाइन मार्चपर्यंत तयार होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपरचा कमाल वेग ताशी 240 किलोमीटर असेल. स्लीपर वंदे भारत सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा पूर्णपणे भिन्न असेल. न्यू वंदे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. त्याचे इंटीरियरही पूर्णपणे बदलले जाईल.
आता नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या सुविधांचा स्तर राजधानी एक्स्प्रेसपेक्षा खूपच चांगला असणार आहे. वंदे स्लीपर ट्रेनचा सरासरी वेग राजधानी एक्स्प्रेसपेक्षा सुमारे 40% जास्त असेल, ज्यामुळे तुमचा प्रवासाचा वेळही वाचेल.
मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारतच्या लोकप्रियतेनंतर रेल्वे विभाग चेन्नईच्या ICF येथे वंदे स्लीपर एक्स्प्रेसच्या डिझाइनवर काम करत आहे. त्याची रचना पुढील वर्षी म्हणजे मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
वंदे स्लीपरची चाचणी वर्षभर चालणार आहे. या स्लीपर ट्रेनच्या बोगीच्या लेआउट डिझाइन आणि आतील भागात 40 ते 50% बदल शक्य आहेत.
विशेष म्हणजे, वंदे भारत स्लीपर कमाल 240 किमी/तास वेगाने चालवली जाईल. ट्रेनचा वेग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे.
त्यासाठी ट्रॅकचे अपग्रेडेशन करण्यात येत आहे. त्याचबरोबर, सर्व वंदे भारतमध्ये अॅडव्हान्स सिग्नल सिस्टम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.