Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबात मोठी अपडेट, आता रेल्वे कर्मचारी करणार 'हे' काम

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत बराच गदारोळ होताना दिसत आहे. अनेक सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी करत आहेत
Old Pension Scheme
Old Pension SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत बराच गदारोळ होताना दिसत आहे. अनेक सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात निदर्शनेही कर्मचारी करत आहेत.

दरम्यान, नव्या पेन्शन योजनेविरोधातही लोकांचा रोष दिसून येत आहे. आता पेन्शन योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. केंद्र सरकारकडे जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत आहे.

रॅली

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटना NFIR, URMU आणि इतर महासंघ नवीन पेन्शन योजनेच्या (NPS) विरोधात एकत्र रॅली काढणार आहेत. या रॅलीची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटना 10 ऑगस्टला दिल्लीतील (Delhi) रामलीला मैदानावर मोर्चा काढणार आहेत. यादरम्यान देशभरातील इतर संस्थांचे कर्मचारीही सहभागी होणार आहेत.

Old Pension Scheme
Old Pension Scheme: ते पात्र आहेत पण...; असे म्हणत जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

पेन्शन योजना

नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेन (NFIR) चे सरचिटणीस एम रघुवैय्या आणि नॉर्दर्न रेल्वे मजदूर युनियन (URMU) चे सरचिटणीस बीसी शर्मा यांनी सांगितले की, 10 ऑगस्ट रोजी रामलीला मैदानावर विविध महासंघ/संघटनांसह नवीन पेन्शन योजनेच्या विरोधात रॅली काढण्यात येणार आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांचा (Employees) समावेश आहे. या रॅलीत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

यामध्ये राज्य सरकार आणि संरक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी, डॉक्टर, शिक्षक आदी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Old Pension Scheme
Old Pension Scheme: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सरकार बनवतयं नवा फॉर्म्युला, दरमहा मिळणार इतके पैसे!

जुनी पेन्शन योजना

एका निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी सांगितले की, आमची मागणी आहे की जो जुनी पेन्शन योजना लागू करेल त्यालाच मते मिळतील. कोणताही पक्ष आपल्या जाहीरनाम्यात हा मुद्दा आणेल, आम्ही त्या पक्षाला पाठिंबा देऊ.”

रघुवैय्या पुढे म्हणाले की, रामलीला मैदानावर विविध महासंघ/संघटनांसह आंदोलन करण्यात येईल, ज्यामध्ये देशभरातील रेल्वे कर्मचारी सहभागी होतील.

यानिमित्ताने NPS विरोधात तीव्र संघर्षाचा आणि OPS च्या पुनर्स्थापनेचा कार्यक्रम भविष्यात संयुक्त व्यासपीठाद्वारे जाहीर केला जाऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com