देशातील कोळसा संकटाच्या (Coal Crisis) पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत बेरोजगारी, ऊर्जा संकट, शेतकरी संकट आणि महागाई ही देशाची मोठी आणि धोकादायक समस्या असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकारच्या कारकिर्दीत गेल्या आठ वर्षांत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा भारत एक केस स्टडी बनला आहे. (Rahul Gandhi says India's economy collapsed during 8 years of the Modi government's)
राहुल गांधींनी (Rahul Gandhi) ट्विट करत म्हटले की, "वीज संकट, नोकऱ्यांचे संकट, शेतकरी संकट, महागाईचे संकट.... पंतप्रधान मोदींचे 8 वर्षांचे कुशासन हे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या अर्थव्यवस्थेला कसा त्रास सहन करावा लागला आहे याचा भारत केस स्टडी बनला आहे.''
दरम्यान, एप्रिल महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर 7.63 टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार भारतातील (India) बेरोजगारीचा दर, जो मार्चमध्ये 7.60% होता, एप्रिलमध्ये वाढून 7.83% झाला आहे. अहवालात म्हटले आहे की, एप्रिलमध्ये शहरी बेरोजगारीचा दर 9.22% झाला आहे, तर ग्रामीण बेरोजगारी मागील महिन्यात हा दर 7.29% वरुन 7.18% वर आला आहे, तो 8.28% होता.
तसेच, देशातही ऊर्जा संकट आहे. अनेक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट गडद झाले आहे. देशात महागाईही (Inflation) शिगेला पोहोचली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 2355 वर पोहोचली आहे, तर जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. फळे आणि भाज्यांचे भावही गगनाला भिडले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.