Punjab National Bank News: तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. बँकेने काही नंबर जारी केले आहेत, जे तुम्ही तुमच्या फोनमध्ये त्वरित सेव्ह करावेत. या नंबरवर कॉल केल्यावर बँक तुम्हाला मोठा फायदा देईल.
पंजाब नॅशनल बँकेने अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'बँकेकडून ग्राहकांना (Customer) कॉलवरच सर्व सुविधा मिळतील, त्यामुळे तुम्हाला शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. तुम्ही सर्व चिंतांपासून आरामात मुक्त होऊ शकता.'
बँकेने (Bank) सांगितले आहे की, ग्राहक 1800 180 2222, 1800 103 2222, 0120-2490000 किंवा 011-28044907 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. हे नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा.
याशिवाय, तुम्ही अधिकृत मेल आयडी care[at]pnb[dot]co[dot]in वर देखील संपर्क साधू शकता. तुम्ही इथे मेल करुन बँकेच्या सुविधांबद्दल माहिती मिळवू शकता.
या नंबरवर कॉल करुन, तुम्ही डेबिट कार्ड इश्यू किंवा ब्लॉकिंग, बॅलन्सची चौकशी, शेवटच्या 5 ट्रान्झॅक्शनचे तपशील, चेक बुक रिक्वेस्ट आणि चेक स्टेटस, ई-स्टेटमेंटसाठी नोंदणी, पेमेंट चेक थांबवणे आणि अकाउंट फ्रीझ अशा अनेक गोष्टी करु शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.