पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या, 15 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्टार्टअपशी संवाद साधतील; स्टार्टअप्स ग्रोइंग फ्रॉम रूट्ससह सहा थीमवर पंतप्रधानांसमोर सादरीकरण करतील. कृषी, आरोग्य, एंटरप्राइझ सिस्टम्स, स्पेस, इंडस्ट्री 4.0, सिक्युरिटी, फिनटेक, पर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या संवादाचा भाग असतील.
150 पेक्षा जास्त स्टार्टअप्सची सहा वर्किंग ग्रुप्समध्ये विभागणी केली गेली आहे ज्यात ग्रोइंग फ्रॉम रूट्सचा समावेश आहे; डीएनए नडिंग; स्थानिक ते जागतिक; भविष्यातील तंत्रज्ञान; मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बिल्डिंग चॅम्पियन्स; आणि शाश्वत विकास असा असणार आहे. प्रत्येक गट संवादात दिलेल्या थीमवर पंतप्रधानांसमोर सादरीकरण करेल. स्टार्टअप्स देशामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात हे समजून घेणे हा या संवादाचा उद्देश असणार आहे.
आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, "सेलिब्रेटिंग इनोव्हेशन इकोसिस्टम" हा आठवडाभर चालणारा कार्यक्रम, डीपीआयआयटी, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, स्टार्टअप इंडिया उपक्रम 10 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत आयोजित केला जात आहे.
स्टार्टअप्सचा देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या क्षमतेवर पंतप्रधानांचा ठाम विश्वास आहे. 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया या प्रमुख उपक्रमाच्या शुभारंभात हे दिसून आले. सरकारने स्टार्टअपच्या वाढीला आणि विकासाला चालना देण्यासाठी सक्षम वातावरण उपलब्ध करून देण्यावर काम केले आहे. याचा देशातील स्टार्टअप इकोसिस्टमवर जबरदस्त परिणाम झाला आहे आणि त्यामुळे देशातील युनिकॉर्नची आश्चर्यकारक वाढ झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.