आता देशात पुन्हा वाढत्या किमतीचे युग येणार असून सर्वसामन्यांसाठी ही चिंतेची बातमी ठरू शकते. देशात गृहउपयोगी पडणाऱ्या गोष्टींसह बिस्किटेसुद्धा (Biscuit) महाग होणार असल्याची बातमी आली आहे. याशिवाय मेकअप (Makeup) किंवा ब्युटी प्रोडक्टसच्या (Beauty Products) किमतीतही वाढ होणार आहे. का ते जाणून घेऊया
* कंझ्युमर ड्युरेबल्स प्रोडक्ट्स
रेफ्रीजरेटर- एसी, टीव्ही (TV), कूलर (Cooler) यासारखी घरगुती उपकरणे महाग होतील, वस्तूच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने उत्पादनांच्या किंमती पुढे वाढू शकतात. एका अहवालानुसार कोरोनाची (Corona) परिस्थिति नियंत्रणात आल्यानंतर उत्पादनाची मागणी पुन्हा वाढेल आणि त्यांची किंमती वाढत आहे. त्यामुळे गृहपयोगी गोष्टींच्या किंमती वाढणार आहेत.
* इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढणार
ओरिएंट इलेक्ट्रॉनिक या सेगमेटमध्ये कार्यरत असलेल्या कंपनीने कमोडिटीच्या किमती सातत्याने वाढत असल्याचे म्हटले आहे. स्टीलपासून प्लॅस्टिक (Plastic) , झिंक, तांबे या सर्वाच्या किंमती आणि किंमती पूर्वीच्या तुलनेत वाढल्या आहेत, त्यामुळे आता पंखे, कूलरपासून ते स्वयंपाकघरातील वस्तूंच्या किंमतीत होणारी वाढ टाळता येणार नाही. या उत्पादनांच्या किंमतीत 4 ते 5 टक्के वाढ नोंदवली जाऊ शकते.
* बिस्किट महाग होणार
भारतातील (India) सर्वात मोठी बिस्किट कंपनी ब्रिटानिया देखील उत्पादनांच्या किंमती वाढवू शकते कारण गहू, साखर, पाम तेलाच्या किंमती सतत वाढत आहेत आणि बिस्किटांच्या किंमती वाढत आहेत. कंपनीने स्पष्टपणे सूचित केले आहे की बिस्किटच्या किंमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. त्याचा परिणाम ब्रिटानियाच्या गुड डे बिस्किटच्या किंमतीवर प्रथम दिसून येतो.
* ब्युटी प्रोडक्टसच्या किमतीत होणार वाढ
यामध्ये लिपस्टिक, आयलाइनर, कॉम्पॅक यासारख्या गोष्टींसाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागतील. यामुळे आताच ब्युटी प्रोडक्टसची खरेदी करून घ्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.