Electric Vehicles Price Hike: इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमतीत मोठी वाढ होणार; 1 जूनपासून होणार 'हे' बदल

तुमच्या बजेटवर होणार परिणाम
Electric Scooter
Electric Scooter Dainik Gomantak
Published on
Updated on

EV's Price Hike after June 1st: जून महिना आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात काही बदल होत असतात.

1 जूनपासूनदेखील अनेक बदल होणार आहेत आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे जून महिना सुरू होण्यापूर्वी कोणते बदल होणार आहेत आणि त्यांचा तुमच्यावर कसा परिणाम होईल, ते जाणून घेऊया.

Electric Scooter
Vande Bharat Express: मोदी सरकारने दिली आनंदाची बातमी! वंदे भारत ट्रेन आता आणखी होणार खास, 30 मे पासून...

गॅस सिलिंडर दरात बदल

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती बदलतात. एलपीजी गॅसच्या किमती दर महिन्याच्या एका तारखेला निश्चित केल्या जातात. एप्रिल आणि मेच्या पहिल्या तारखेला 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती.

मात्र, 14 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती.

CNG-PNG च्या किमती बदलू शकतात

एलपीजी सिलिंडरप्रमाणेच सीएनजी-पीएनजीच्या किमतीही दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात. पेट्रोलियम कंपन्या दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये सीएनजी-पीएनजीच्या किमती बदलतात.

एप्रिलमध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात करण्यात आली होती. तथापि, पहिल्या मे रोजी फारसा बदल झाला नाही. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या नजरा एका तारखेकडे लागल्या असून सीएनजी-पीएनजीच्या दरात बदल होण्याची त्यांना अपेक्षा आहे.

Electric Scooter
FPI: शेअर बाजारात विदेशी गुंतवणूक वाढली; मे महिन्यात 37316 कोटींची गुंतवणूक

इलेक्ट्रिक वाहने महागणार आहेत

1 जूननंतर तुम्ही इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटर खरेदी करायला गेलात तर तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागेल.

21 मे रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, अवजड उद्योग मंत्रालयाने FAME-II अनुदानाची रक्कम सुधारित केली आहे आणि ती 10,000 रुपये प्रति kWh इतकी कमी केली आहे. बहुतेक इलेक्ट्रिक वाहने 25,000 ते 35,000 रुपयांपर्यंत महाग होऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com