Ayushman Yojana: राष्ट्रपतींकडून आनंदाची बातमी, आता 'या' वयोगटातील लोकांना मिळणार आयुष्मान योजनेअंतर्गत उपचार!

President Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 18 व्या लोकसभेला संबोधित करताना देशातील ज्येष्ठांसाठी आनंदाची बातमी दिली.
Ayushman Yojana: राष्ट्रपतींकडून आनंदाची बातमी, आता 'या' वयोगटातील लोकांना मिळणार आयुष्मान योजनेअंतर्गत उपचार!
President Droupadi MurmuDainik Gomantak

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 18 व्या लोकसभेला संबोधित करताना देशातील ज्येष्ठांसाठी आनंदाची बातमी दिली. गुरुवारी त्यांनी सांगितले की, 70 वर्षे ओलांडलेल्या सर्व वृद्धांवर आयुष्मान योजनेंतर्गत उपचार केले जातील. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातही असे आश्वासन दिले होते. लोकसभेचे अधिवेशन 24 जूनपासून सुरु झाले आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांनी पुढे सांगितले की, नवीन सरकार 70 वर्षांवरील सर्व व्यक्तींना आयुष्मानचा लाभ देत आहे. एवढेच नाही तर सरकार सातत्याने शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. 20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. यातून शेतकरी स्वावलंबी बनले आहेत.

Ayushman Yojana: राष्ट्रपतींकडून आनंदाची बातमी, आता 'या' वयोगटातील लोकांना मिळणार आयुष्मान योजनेअंतर्गत उपचार!
Ayushman Bharat Yojana: मोफत उपचारांसाठी बनवा आयुष्मान कार्ड बनवा! वाचा कसा करावा अर्ज

दरम्यान, जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की, 'वृद्धांची सर्वात मोठी चिंता ही आहे की ते त्यांच्या आजारावर उपचार कसे करतील. मध्यमवर्गीयांमध्ये ही चिंता अधिकच गंभीर आहे. 70 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला आयुष्मान भारत योजनेत आणण्याचा संकल्प भाजपने आता केला आहे.'

भाजपने (BJP) जाहीरनाम्यात म्हटले होते की, 'आम्ही वृद्धांना कव्हर करण्यासाठी आणि त्यांना मोफत आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा देण्यासाठी आयुष्मान भारत योजनेचा विस्तार करु.' ही योजना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक वर्ष 2019 च्या अर्थसंकल्पात सुरु केली होती. याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेही म्हणतात, ज्या अंतर्गत सध्या 5 लाख रुपयांचे संरक्षण उपलब्ध आहे.

Ayushman Yojana: राष्ट्रपतींकडून आनंदाची बातमी, आता 'या' वयोगटातील लोकांना मिळणार आयुष्मान योजनेअंतर्गत उपचार!
Ayushman Bharat Yojana|'हे' लोक करू शकतात आयुष्मान योजनेसाठी अर्ज

दुसरीकडे, यावेळी 18 व्या लोकसभेला संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू यांनी 'माय भारत'चाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, राष्ट्र उभारणीत तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकारने (Government) 'मेरा युवा भारत-माय भारत' मोहीम सुरु केली आहे. आतापर्यंत 1.5 कोटीहून अधिक तरुणांनी यात नोंदणी केली आहे. तसेच, सरकार डिजिटल युनिव्हर्सिटी बनवण्याच्या दिशेनेही काम करत असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com