Post Office: पोस्टाच्या 'या' योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास मिळणार मोठा फायदा, सरकारने दिली माहिती!

Post Office Schemes Interest Rates: पोस्ट ऑफिस बचत खात्यावर ग्राहकांना 4 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. यासोबतच पोस्ट ऑफिस आरडीमध्ये ग्राहकांना 5.80 टक्के दराने व्याज मिळते.
Post Office
Post OfficeDainik Gomantak
Published on
Updated on

Post Office Schemes Interest Rates: पोस्ट ऑफिसकडून सर्वसामान्यांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही स्कीममध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्हाला कोणत्या स्कीमवर व्याजाचा लाभ मिळत आहे.

पोस्ट ऑफिस बचत खात्यावर ग्राहकांना 4 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. यासोबतच पोस्ट ऑफिस आरडीमध्ये ग्राहकांना 5.80 टक्के दराने व्याज मिळते.

दरम्यान, पोस्ट ऑफिस (Post Office) टाईम डिपॉझिट योजनेत 7 टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे. याशिवाय, पोस्ट ऑफिसच्या मासिक बचत योजनेत ग्राहकांना 7.10 टक्के दराने व्याज मिळत आहे.

Post Office
Post Office Scheme: पोस्टाची 'ही' योजना फक्त तुमच्याचसाठी, मिळणार शानदार रिटर्न

तसेच, पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ग्राहकांना 8 टक्के दराने व्याज देत आहे. याशिवाय पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाबद्दल बोलायचे झाल्यास तर त्यावर 7.10 टक्के दराने व्याज मिळेल. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना (Investors) 7 टक्के दराने व्याज मिळेल. त्याचबरोबर किसान विकास पत्रामध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.20 टक्के दराने व्याज मिळेल.

Post Office
Post Office: पोस्टात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 5,000 रुपये गुंतवून मिळवा 8 लाख!

या सर्वांशिवाय, जर आपण सरकारी योजना सुकन्या समृद्धी योजनेबद्दल बोललो तर ही योजना देशातील मुलींसाठी चालवली जात आहे, ज्यामध्ये 7.60 टक्के दराने व्याज मिळत आहे. त्याचवेळी, या योजनेत किमान शिल्लक 250 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com