Post Office Latest Scheme
Post Office Latest SchemeDainik Gomantak

Post Office Scheme: महिन्याला खात्यात येणार इतके हजार रुपये, जाणून घ्या तपशील

केंद्र आणि राज्य सरकारही लोकांच्या मदतीसाठी सातत्याने पुढे येत आहे.

कोरोना विषाणूच्या (Corona Variant) संसर्गाच्या काळात जगभरातील लोकांचे फार मोठे नुकसान झाले असून त्यांचे आर्थिक चाक ठप्प झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारही लोकांच्या मदतीसाठी सातत्याने पुढे येत आहे. (Post Office Latest Scheme)

Post Office Latest Scheme
PM नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! 1, 2, 5, 10 अन् 20 रुपयांची नाणी करणार जारी

आता सरकारी संस्था म्हणजेच पोस्ट ऑफिसनेही (Post Office) एक योजना सुरू केली आहे, ज्याचा लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. ही योजना खास मुलांसाठी आहे, ज्यामध्ये तुम्ही मोठी गुंतवणूक करून मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता.

जर तुम्हाला तुमच्या मुलाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये त्याचे खाते उघडा. लहान मुले असोत की वडीलधारी प्रत्येकाला पैसे वाचवायचे असतात आणि आपले भविष्य सुरक्षित करायचे असते. जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही पोस्ट ऑफिसचे एमआयएस खाते उघडायला हवे.

या योजनेमध्ये इतके रुपये गुंतवावे लागतील,

पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्‍या या योजनेत सामील होऊन तुम्ही तुमचे संयुक्त खाते देखील उघडू शकता. जर तुम्ही तुमच्या खात्यात 3.50 लाख रुपये जमा केले तर दर महिन्याला तुम्हाला व्याजदराने 1925 चा लाभ मिळणार आहे.

Post Office Latest Scheme
जाणून घ्या गोव्यातील आजची पेट्रोल-डिझेलच्या दराची स्थिती

जर तुम्ही 2 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरमहा 1100 रुपये व्याजदराने मिळणार आहेत. 5 वर्षानंतर एकूण व्याज रु. 66,000 इतके होईल.

तुम्ही फक्त खाते उघडा

तुम्ही तुमचे खाते देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये सहजरित्या उघडू शकता.

या खात्याची कमीतकमी किंमत हजार रुपये आहे, जी तुम्हाला मेंटेन ठेवावी लागेल.

तुम्ही खात्यात जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करू शकतात.

या योजनेत तुम्हाला आता मिळणारे व्याज 6.6% असणार आहे.

जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावाने हे खाते उघडायचे असेल तर त्यांचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असायला हवे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com