PMSYM 46 lakh employee will get 3000 rupees monthly pension
PMSYM 46 lakh employee will get 3000 rupees monthly pension Dainik Gomantak

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना , 46 लाख कामगारांना मिळणार 3000 रुपये पेन्शन

Published on

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन (PM-SYM) पेन्शन योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील सुमारे 46 लाख कामगारांनी नोंदणी केली आहे. कामगार मंत्रालयाने (Ministry of Labour and Employment) एका निवेदनात ही माहिती दिली असून मासिक पेन्शनच्या स्वरूपात वृद्धावस्थेत सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाच्या 60 वर्षांनंतर किमान आश्वस्त मासिक 3000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे.

कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत, असंघटित क्षेत्रातील एकूण 45,77,295 कामगारांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे.(PMSYM 46 lakh employee will get 3000 rupees monthly pension)

55 ते 200 रुपयांपर्यंतचा हप्ता

या योजनेत विविध वयोगटानुसार 55 ते 200 रुपये मासिक योगदान देण्याची तरतूद आहे. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा 55 रुपये योगदान द्यावे लागेल. त्याच वेळी, 30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तींना 200 रुपये योगदान द्यावे लागेल.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत नोंदणीसाठी, जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. यानंतर IFSC कोडसोबत आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खाते द्यावे लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल.

उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असावे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत खाते असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यामध्ये गुंतवणुकीचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 40 वर्षे आहे. याशिवाय बँकेला संमतीपत्र द्यावे लागेल. जे मजूर इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाहीत ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत अर्ज करणाऱ्या मजुराचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

कोणताही मजूर कामगार विभाग, LIC, EPFO ​​च्या कार्यालयात जाऊन या योजनेची माहिती घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही www.maandhan.in ला भेट देऊ शकता किंवा हेल्पलाइन क्रमांक 14434 वर कॉल करू शकता.

PMSYM 46 lakh employee will get 3000 rupees monthly pension
'ओमिक्रॉनचा' फटका, जागतीक बाजारही कोसळला

कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ

ही योजना केवळ असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांनाच लागू असेल. यामध्ये घरकाम करणारे, रस्त्यावरील विक्रेते, ड्रायव्हर, प्लंबर, शिंपी, मध्यान्ह भोजन कामगार, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, चिंधी वेचणारे, विडी बनवणारे, हातमाग, शेती कामगार, मोची, धुलाई, चामडे कामगार इत्यादींचा समावेश होतो.संगठित क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती या कर्मचारी भविष्य निधि (ईपीएफओ), नेशनल पेंशन स्कीम (एनपीएस) या राज्य कर्मचारी बीमा निगम (ईएसआयसी) सदस्य किंवा आयकर पेमेंट करणारे लोक या योजनेचा फायदा घेऊ शकणार नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com