PM Kisan Latest News: केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. यातील सर्वात महत्त्वाकांक्षी योजनेचे नाव आहे 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना' (पीएम किसान सन्मान निधी योजना).
या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम लाभार्थ्याला वर्षाला तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते. आतापर्यंत 13 हप्ते पाठवले असून, शेतकरी 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.
पीएम किसान (PM Kisan) योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये 2-2 हजार रुपये देते. दर चार महिन्यांच्या अंतराने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येईल का, असा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात असतो. हे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
सरकारच्या नियमांनुसार, शेतकरी (Farmer) कुटुंबातील फक्त एक व्यक्तीच पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेंतर्गत शेतकरी स्वतःचे नाव किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव नोंदवू शकतो. त्यामुळे एकाच वेळी दोन व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अनेक लोक अशा अफवांवर विश्वास ठेवत आहेत.
तसेच, योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीच्या नोंदींची पडताळणी करावी लागते. ई-केवायसी ऑनलाइन पूर्ण करावे लागेल.
हे पूर्ण केल्यानंतर, शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल.
जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याची आणि आधार क्रमांकाची माहिती बरोबर असल्याची खात्री करावी लागेल.
ईमेल आयडी pmkisan-ict@gov.in
हेल्पलाइन क्रमांक- 155261
1800115526 (टोल फ्री)
आपण 011-23381092 वर संपर्क साधू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.