PM Kisan Samman Nidhi: 1 एप्रिलपासून पीएम किसानच्या हप्त्याची रक्कम वाढणार! 6000 ऐवजी...

PM Kisan Samman Nidhi: 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पाकडून नोकरदार आणि शेतकरी दोघांनाही मोठ्या आशा आहेत.
PM Kisan Scheme
PM Kisan Scheme Dainik Gomantak

PM Kisan Samman Nidhi: 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पाकडून नोकरदार आणि शेतकरी दोघांनाही मोठ्या आशा आहेत. यावेळी नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना आयकर सवलतीच्या बाबतीत दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. यावेळी सर्वांच्या नजरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेकडे असतील. 2024 च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारकडून अनेक लोकप्रतिनिधी आश्वासने दिली जाऊ शकतात.

सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते

या अर्थसंकल्पात केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधीची रक्कम वाढवण्याची घोषणा करु शकतात. पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) मध्ये दरवर्षी मिळणाऱ्या 6 हजार रुपयांच्या रकमेत वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकार हा निर्णय घेऊ शकते.

PM Kisan Scheme
PM kisan Samman Nidhi Scheme: 10 वा हप्ता नवीन वर्षात 1 जानेवारीला

3 ऐवजी 4 वेळा पैसे मिळतील

शेतकऱ्यांना (Farmers) तीन हप्त्यांमध्ये दिलेली रक्कम 3 ऐवजी 4 पट दिली जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक तिमाहीत 2000 रुपये देणे अपेक्षित आहे. सध्या दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग केले जातात. मात्र बदलानंतर दर तिमाहीला 2000 रुपये दिले जातील. म्हणजेच, शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी 8000 रुपये वार्षिक देण्यात येणार आहेत.

PM Kisan Scheme
PM Kisan: 'या' राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा 13 वा हप्ता

तसेच, पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता जानेवारी 2023 मध्येच येणे अपेक्षित आहे. यापूर्वी 12 हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून जमा करण्यात आले आहेत. बियाणे आणि खतांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. पीएम किसानची रक्कम वाढवल्यास एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा 2000 रुपयांचा हप्ता येणे अपेक्षित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com