PM Kisan Scheme: शेतकऱ्यांसाठी खूशखबर, 'या' दिवशी खात्यात येणार PM किसानचा 14 वा हप्ता

PM KISAN 14th Installment: काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, सरकार लवकरच पीएम किसान निधीचा हप्ता जारी करु शकते.
PM Kisan
PM KisanDainik Gomantak

PM Kisan Samman Nidhi: केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi) 14 वा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही. पीएम किसानच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना जुलैच्या मध्यापर्यंत पैसे मिळू शकतात, असे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, सरकार लवकरच पीएम किसान निधीचा हप्ता जारी करु शकते.

काही शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहेत

पीएम किसान निधी अंतर्गत आतापर्यंत 13 हप्ते जारी करण्यात आले आहेत. यावेळी बहुतांश शेतकऱ्यांना योजनेच्या 14 व्या हप्त्याच्या बदल्यात 2000 रुपये मिळतील. मात्र यावेळीही काही शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

अहवालानुसार, ज्या शेतकऱ्यांना (Farmer) 13 व्या हप्त्यात 2000 रुपये मिळाले नाहीत, त्यांना 4000 रुपये मिळणे अपेक्षित आहे. असे अनेक शेतकरी आहेत, जे त्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करु शकले नाहीत.

PM Kisan
PM Kisan Samman Nidhi Scheme: प्रतीक्षा लवकरच संपणार! जूनच्या 'या' आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 14 वा हप्ता

पीएम किसान योजना 2019 मध्ये सुरु झाली

जर तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर तुमचे नाव बघायचे असेल, तर होमपेजवर फार्मर्स कॉर्नर अंतर्गत लाभार्थी स्टेटस नाव तपासा. पीएम किसान योजना पीएम मोदींनी 2019 मध्ये सुरु केली होती. शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेत दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात.

PM Kisan
PM Kisan Scheme: करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता 6000 ऐवजी खात्यात येणार 12000 रुपये!

योजनेतर्गंत, प्रत्येक हप्त्यापैकी 2000 रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पोहोचतात. यापूर्वी काही लोकांना सरकारने (Government) या योजनेतून वगळले होते, अशा लोकांमध्ये शेतकरी कुटुंबातील घटनात्मक पदांवर असणारी व्यक्ती, राज्य किंवा केंद्रीय कर्मचारी यांचा समावेश होतो. याशिवाय, दरवर्षी आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांनाही योजनेतून वगळण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com