PM Suraksha Beema Yojana: सरकारी योजनांचा प्रीमियम महागला! जाणून घ्या किती पैसे द्यावे लागणार?

PMJJBY and PMSBY Scheme: तुम्हीही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
Indian Money
Indian MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

PM Jeevan Jyoti Bima Yojana/ PM Suraksha Beema Yojana: तुम्हीही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक, 7 वर्षांनंतर सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) योजनांमध्ये सुधारणा केली आहे. दोन्ही योजनांचा प्रीमियम वाढवण्यात आला आहे. दोन्ही प्लॅनमध्ये प्रति प्रीमियम 1.25 रुपयांची वाढ झाली आहे. याद्वारे तुम्ही संपूर्ण 4 लाख रुपयांचा फायदा घेऊ शकता. चला तर मग अपडेट्स जाणून घेऊया...

आता किती प्रीमियम भरावा लागेल?

तुम्हीही यापैकी कोणतीही योजना घेतली असेल, तर आता तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. यासाठी तुमचे सरकारी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूकीची रक्कम खूपच कमी आहे. यापूर्वी या दोन योजनांमध्ये केवळ 342 रुपये गुंतवावे लागत होते, परंतु आता सरकारने (Government) प्रीमियम वाढवल्यानंतर, तुम्हाला दोन्ही योजना एकत्र करुन संपूर्ण वर्षात केवळ 456 रुपये जमा करावे लागतील. छोट्या गुंतवणुकीत (Investment) तुम्हाला मोठे फायदे कसे मिळू शकतात ते जाणून घेऊया...

Indian Money
Janani Suraksha Yojana: आता 'या' महिलांना मिळणार 6 हजार रुपये !

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा तपशील

या अंतर्गत, विमाधारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात.

18 ते 50 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.

यामध्ये तुम्हाला फक्त 436 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल.

ही मुदत विमा पॉलिसी आहे.

हा विमा वर्षभरासाठी असतो.

Indian Money
Janani Suraksha Yojana: गरोदर महिलांना सरकारकडून मिळणार आर्थिक मदत, असा घ्या लाभ

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

यामध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पूर्णपणे अपंग झाल्यास 2 लाख रुपयांची भरपाई दिली जाते.

या योजनेंतर्गत, विमाधारक अंशतः कायमस्वरुपी अक्षम झाल्यास, त्याला 1 लाख रुपयांचे संरक्षण मिळते.

यामध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती संरक्षण घेऊ शकते.

या योजनेचा वार्षिक प्रीमियम रु.20 आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com