Expressway योजनेत PM Gatishakti चा महत्त्वपूर्ण रोल, 7000 किलोमीटरच्या प्लॅनबाबत...

Modi Government: विकसित देशांच्या पंक्तीत देशाचा समावेश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत.
PM Modi
PM ModiDainik Gomantak

Modi Government: विकसित देशांच्या पंक्तीत देशाचा समावेश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. याशिवाय अनेक विकासकामेही केली जात आहेत.

मोदी सरकार (Government) देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रावरही भर देत आहे आणि त्या दिशेने विकासाशी संबंधित अनेक कामेही केली जात आहेत.

त्याचवेळी, PM गतिशक्ती उपक्रमाचा देशात खूप प्रभाव दिसून आला आहे आणि हजारो किलोमीटर एक्स्प्रेस वेच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता याबाबतची ताजी माहितीही समोर आली आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया...

पंतप्रधान गतिशक्ती योजनेची भूमिका

PM गतिशक्ती उपक्रमाने सुमारे 7000 किमी एक्सप्रेसवेच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या दोन वर्षांत या उपक्रमांतर्गत जीआयएस नकाशांद्वारे सर्वेक्षणाला गती दिली जात आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले की, नवीन रेल्वे मार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणा (FLS) ला गती मिळाली आहे.

PM Modi
7th Pay Commission: दिवाळीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट? डीएमध्ये वाढ होण्याची शक्यता

तपशीलवार सर्वेक्षणातून मदत मिळाली

या उपक्रमामुळे अनेक प्रकल्पांची FLS झाली आहे. या अंतर्गत 2022-23 मध्ये सुमारे 400 प्रकल्पांचे FLS झाले, तर मागील वर्षी ही संख्या केवळ 57 होती.

अधिकाऱ्याने सांगितले की, या प्लॅटफॉर्ममुळे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू पाइपलाइनसाठी तपशीलवार सर्वेक्षण करण्यात मदत झाली आहे. त्यामुळे बरेच फायदेही दिसून आले आहेत.

PM Modi
PM Kisan: पीएम किसानबाबत मोठी अपडेट, 15 ऑक्टोबरपर्यंत 'या' 3 गोष्टी करा... नाहीतर 2000 रुपये विसरा

प्रक्रिया वेळ कमी

याशिवाय, या उपक्रमातून वेळेचीही बचत झाली असून, त्याचे फायदेही दिसून आले आहेत. या माध्यमातून ही प्रक्रिया सहा-नऊ महिन्यांवरुन अवघ्या काही तासांवर आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी पीएम गति शक्ती उपक्रमाला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'पीएम गति शक्तीचे संकलन' जारी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com