जगातील सर्वात मोठ्या 'डिजिटल मार्केट्स' बनण्याकडे भारताची वाटचाल: पीयूष गोयल

'फिनटेक' (Fintech) ऑपरेशन्स असलेला देश म्हणून वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे.
Piyush Goyal
Piyush GoyalDainik Gomantak
Published on
Updated on

कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्थेचे (Indian Economy) बारा वाजलेले असतानाच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी माहिती दिली आहे की, "मोबाईल आणि इंटरनेटच्या झपाट्याने विस्ताराने भारत सर्वात मोठ्या 'डिजिटल बाजारपेठांपैकी (Digital Markets) एक बनण्याच्या तयारीत आहे. 2,100 पेक्षा जास्त 'फिनटेक' (Fintech) ऑपरेशन्स असलेला देश म्हणून वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2021' ला संबोधित करताना, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले की, "जेएएम (जन धन, आधार आणि मोबाइल) ट्रिनिटीने भारताला फिनटेक क्षेत्रात वाढण्यास मदत केली आहे. येणाऱ्या काळात आम्ही आमच्या तांत्रिक क्षमतांचा लाभ घेऊ."

या व्यतिरिक्त, त्यांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, "फिनटेक कंपन्या देशातील आर्थिक समावेशनात महत्वाची भूमिका बजावत आहेत. 'फिनटेक' क्षेत्राने तंत्रज्ञानाच्या दिशेने नागरिकांची लवचिकता आणि अनुकूलता दाखवली आहे. हे प्रमाण जागतिक सरासरीच्या 64 विरुद्ध टक्के इतके आहे. भारतामध्ये जगात सर्वाधिक फिनटेक वापरण्याचे प्रमाण 87 टक्के आहे.

Piyush Goyal
क्रिप्टोकरन्सी तेजीत, बिटकॉइनही 33 लाखांच्या पार

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, "आज, भारत 2,100 पेक्षा जास्त फिनटेक ऑपरेशन्ससह सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. फिनटेक सोल्यूशन्स स्वीकारण्यासाठी गैर-वित्तीय सेवा क्षेत्रे देखील सक्रिय आहेत. त्यांच्या मूल्य साखळीच्या विस्ताराने, फिनटेक सेवांची मागणी वाढेल.

'फिनटेक' म्हणजे काय?

'फिनटेक' हे वित्तीय तंत्रज्ञानाचे संक्षिप्त रुप आहे. आर्थिक कार्यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराला 'फिनटेक' असे म्हणतात. डिजिटल पेमेंट, डिजिटल लोन, इन्शुरन्स टेक किंवा या प्रकारचे काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या कंपन्या फिनटेक कंपन्यांच्या श्रेणीत येतात. अलीकडेच भारताने आशिया खंडातील फिनटेकसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून चीनला मागे टाकले आहे. सध्या, फिनटेक हे अर्थव्यवस्थेच्या सर्वात समृद्ध क्षेत्रांपैकी एक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com