Petrol-Diesel Price Hike: लोकसभा निवडणूक संपताच पेट्रोल आणि डिझेल महागलं, 'या' राज्यात आजपासून दर वाढ

Petrol-Diesel Price Hike: लोकसभा निवडणूक संपताच कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे.
Petrol Price
Petrol PriceDainik Gomantak
Published on
Updated on

Petrol-Diesel Price Hike: लोकसभा निवडणूक संपताच कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. सरकारने आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. सरकारच्या निर्णयानंतर आजपासून कर्नाटकात पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3.05 रुपयांनी महागले आहे. वाढीव किंमती तात्काळ लागू करण्यात आल्या आहेत. कर्नाटक सरकारने सेल्स टॅक्स (KST) मध्ये सुधारणा केली आहे, त्यानंतर पेट्रोलवरील सेल्स टॅक्स 25.92 टक्क्यांवरुन 29.84 टक्के करण्यात आला, तर डिझेलवरील सेल्स टॅक्स 14.3 टक्क्यांवरुन 18.4 टक्के करण्यात आला आहे. कर्नाटकात टॅक्स वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.

सेल्स टॅक्समध्ये वाढ

कर्नाटक सरकारने सेल्स टॅक्समध्ये सुधारणा केली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कर्नाक सेल्स टॅक्स म्हणजेच पेट्रोलवरील KST आता 29.84% आणि डिझेलवर 18.4% वर पोहोचला आहे. सेल्स टॅक्स वाढल्याने थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती वाढतात. करवाढीमुळे कर्नाटकात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे तीन रुपयांनी वाढ झाली आहे. वाढीपूर्वी, बंगळुरुमध्ये पेट्रोल 99.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 85.93 रुपये प्रति लिटरने विकले जात होते. दिल्लीपेक्षा बंगळुरुमध्ये पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 87.62 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. या वाढीमुळे त्यात आणखी वाढ झाली आहे.

Petrol Price
7th Pay Commission: निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट, 4 टक्क्यांच्या DA वाढीला दिली मंजूरी; HRA ही वाढला

बंगळुरुमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

कर्नाटक सरकारने सेल्स टॅक्समध्ये वाढ केल्यानंतर राजधानी बंगळुरुमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर ₹ 99.84 वरुन ₹ 102.84 प्रति लीटर झाली आहे. तर डिझेलचा दर 85.93 रुपये वरुन 88.95 रुपये प्रति लिटर झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील, अशी अपेक्षा असताना कर्नाटकात थेट 3 रुपयांनी वाढ झाली. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. सरकारच्या या निर्णयाचा बोजा सर्वसामान्यांवरच नव्हे तर व्यावसायिकांवरही पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Food Price Increase
Commercial LPG Price Hike
Central Government DA Hike 2 Percent
Petrol Diesel Price Hike India Nayara Energy
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com