Pension Hike News: पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही पेन्शन वाढीची वाट पाहत असाल तर नवरात्रीमध्ये तुम्हाला सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे.
केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारकडूनही कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आता सरकारने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिल जारी करुन वाढीव पेन्शनची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच राज्य सरकारने प्रवास भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्तीसगड (Chhattisgarh) सरकारने विधानसभेत एक दुरुस्ती विधेयक मंजूर केले आहे, ज्यामध्ये पेन्शन आणि प्रवास भत्ता वाढवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. या विधेयकानुसार माजी आमदारांचे पेन्शन 35 हजारांवरुन 58 हजार 300 रुपये करण्यात येणार आहे.
या विधेयकानुसार, माजी आमदारांना त्यांच्या सदस्यत्वाच्या पहिल्या कार्यकाळानंतर (पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी) प्रत्येक एक वर्षासाठी दरमहा एक हजार रुपये अतिरिक्त पेन्शन (Pension) मिळण्याचा अधिकार असेल.
यासोबतच, विधेयकात अशी माहिती मिळाली आहे की, सध्या हा भत्ता रेल्वे किंवा विमान प्रवासासाठी सध्याच्या 8 लाख रुपये प्रतिवर्षी उपलब्ध आहे. त्याचबरोबर आता ती वाढवून 10 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर माजी आमदारांचा हा भत्ता वार्षिक 4 लाखांवरुन 5 लाखांपर्यंत वाढला आहे.
माजी आमदारांना 10,000 रुपये टेलिफोन भत्ता मिळेल आणि ऑर्डरली भत्ता 15,000 रुपये असेल. राज्याने घेतलेल्या या निर्णयानंतर सरकारला 16.96 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहेत.
गेल्या वर्षी जुलैमध्ये विधानसभेने मुख्यमंत्री, सभापती, मंत्री आणि आमदारांच्या पगारात वाढ करण्याचे विधेयक मंजूर करुन राज्याच्या तिजोरीवर वार्षिक 6.81 कोटी रुपयांचा बोजा टाकला होता. छत्तीसगड विधानसभेत 90 सदस्य आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.