Paytm च्या शेअर्समध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 10 हजार कोटी रुपये बुडाले

याआधी, लिस्टिंगच्या दिवशी म्हणजेच 22 नोव्हेंबरला पेटीएमचा स्टॉक 27 टक्क्यांनी घसरला होता. Paytm चा IPO हा भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO होता.
Paytm Share laps by 19 percent investors loss 10 thousand crore rupees  

Paytm Share laps by 19 percent investors loss 10 thousand crore rupees  

Dainik Gomantak

Published on
Updated on

देशातील सुप्रसिद्ध कंपनी पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स या कंपनीच्या शेअर्समध्ये (Paytm Share) मोठी घसरण झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सुरवातीच्या गुंतवणूकदारांचा लॉक-इन कालावधी बुधवारी संपला. सोप्या शब्दात सांगायचे तर मोठे गुंतवणूकदार आता त्यांचे शेअर्स विकू शकतात. त्यामुळे कंपनीच्या शेअर्स मध्ये मोठी घसरण झाली आहे.कंपनीचा शेअर आज 13 टक्क्यांनी घसरला आहे आणि त्यामुळे या दरम्यान गुंतवणूकदारांचे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.(Paytm Share laps by 19 percent investors loss 10 thousand crore rupees  )

याआधी, लिस्टिंगच्या दिवशी म्हणजेच 22 नोव्हेंबरला पेटीएमचा स्टॉक 27 टक्क्यांनी घसरला होता. Paytm चा IPO हा भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO होता. कंपनीने आयपीओद्वारे 18300 कोटी रुपये उभे केले आहेत . यानंतर अँकर गुंतवणूकदारांसाठी लॉकइन कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार, जुलै-सप्टेंबर दरम्यान कंपनीचे उत्पन्न 64 टक्क्यांनी वाढून 1090 कोटी रुपये झाले होते. Paytm ने लिस्ट केल्यानंतर पहिल्यांदाच आपली कमाई सार्वजनिकरित्या उघड केली. एका वर्षापूर्वी याच कालावधीत, कंपनीला 437 कोटींच्या तुलनेत 473 कोटींचा तोटा झाला होता आणि खर्च वाढून सुमारे 1170 कोटींवरून सुमारे 1600 कोटी झाला होता.

<div class="paragraphs"><p>Paytm Share laps by 19 percent investors loss 10 thousand crore rupees&nbsp;&nbsp;</p></div>
व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइसचं नवीन अपडेट, चुकीच्या मेसेज पासून वाचा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com