गुगल पे मध्ये आले अफलातून फिचर, आता बिल स्पिलट करणे होणार सोपे

गूगल पे वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची माहिती.
Pay attention to Google Pay users, new bills split feature has arrived

Pay attention to Google Pay users, new bills split feature has arrived

Dainik Gomantak

Published on
Updated on

गूगल पे वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची माहिती. कंपनीने बिल स्प्लिट वैशिष्ट्य आणले आहे, ज्याची गूगल पे वापरकर्ते बर्याच काळापासून वाट पाहत होते. या वैशिष्ट्याची घोषणा गेल्या महिन्यात गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये करण्यात आली होती, जी शेवटी भारतात आणली गेली आहे. गूगल पे वापरकर्ते गूगल प्ले स्टोर किंवा Apple App Store वरून Google Pay अॅप अपडेट केल्यानंतर बिल स्पिलट फीचर वापरू शकतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया-

हे फीचर ग्रुप पेमेंट सारखे काम करते. यामध्ये यूजर्सना एकाच वेळी अनेकांना पैसे ट्रान्सफर करण्यात मदत केली जाते. समजा तुम्ही चार मित्र एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला आहात आणि एकूण बजेट 1260 रुपये आहे. अशा परिस्थितीत, Google Bills स्प्लिट फीचर तुम्हाला 1260 रुपये आपापसात स्पिलट करण्यास अनुमती देईल. यासाठी तुम्हाला पेमेंट (payment) ऑप्शनवर जाऊन 1260 रुपये टाकावे लागतील. यानंतर चार जणांची नावे निवडावी लागतील. यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला 315 रुपये बिल येईल.

<div class="paragraphs"><p>Pay attention to Google Pay users, new bills split feature has arrived</p></div>
Retirement Fund Tips: पैसे साठवताना 'या' चुका करणे टाळा

कसे वापरायचे

  • सर्व प्रथम तुमच्या फोनवर Google Pay अॅप उघडा.

  • त्यानंतर “नवीन पेमेंट” बटणावर टॅप करा.

  • त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. जिथे वरच्या बाजूला सर्च बार आणि खालच्या बाजूला New Group पर्याय असेल.

  • ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. आणि त्याचे स्वतःचे नाव आणि मित्रांची नावे प्रविष्ट करा. त्यानंतर, नेक्स्ट बटण दाबा.

  • त्यानंतर तुम्हाला ग्रुपचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर Create बटणावर क्लिक करा.

  • मग तुम्ही या ग्रुपद्वारे तुमच्या मित्रांसह स्प्लिट बिल भरू शकता.

  • ग्रुप तयार केल्यानंतर, तुम्हाला Split an expense बटणावर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर Google तुमची रक्कम विभाजित करेल. तसेच, आपण किती पैसे खर्च केले हे प्रदर्शित करेल.

  • त्यानंतर तुम्हाला “Send Request” बटणावर टॅप करावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com