रामदेव बाबा यांच्या कंपनीतून नफा मिळवण्याची उत्तम संधी, Share ने दिला 39000% परतावा

Patanjali Group IPO: रामदेव बाबा यांची कंपनी पतंजली लवकरच चार नवीन IPO आणण्याच्या तयारीत आहे.
Ramdev Baba
Ramdev Baba Dainik Gomantak

Patanjali Group to Bring 4 IPO: रामदेव बाबा यांची कंपनी पतंजली लवकरच चार नवीन IPO आणण्याच्या तयारीत आहे. पतंजली पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांना लाभांश म्हणजेच, नफ्यातील काही भाग वितरित करणार आहे. याची घोषणा नुकतीच रामदेव बाबा यांनी केली आहे. येत्या 5 ते 7 वर्षात पतंजलीचा व्यवसाय 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही वर्षांत त्यांचा समूह पाच लाख लोकांना थेट रोजगार देईल, अशी घोषणा त्यांनी केली.

पतंजलीचे बाजार भांडवल 50 हजार कोटींच्या पुढे आहे

माहितीनुसार, पतंजलीने (Patanjali) अलीकडेच आर्थिक वर्ष 2021-22 साठी प्रति इक्विटी शेअर 5 रुपये लाभांश जाहीर केला होता. त्याची रेकॉर्ड डेट 26 सप्टेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. पतंजली फूड्स लिमिटेडचा स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. यामुळे पतंजलीच्या बाजार भांडवलाने 50 हजार कोटींचा टप्पा ओलांडला. स्टॉकचा (Stocks) 52 आठवड्यांचा उच्चांक 1,415 रुपये आहे.

Ramdev Baba
अ‍ॅलोपॅथीच्या विरोधात बोलून रामदेव बाबा वादाच्या भोवऱ्यात, SC ने मागितले उत्तर

39250 टक्के परतावा मिळाला

पतंजलीच्या स्टॉकच्या कामगिरीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तीन वर्षांपूर्वी रामदेव यांच्या कंपनीचा शेअर 3,54 रुपयांपासून सुरु झाला आणि प्रति शेअर 1393 रुपयांपर्यंत पोहोचला. केवळ 3 वर्षात गुंतवणूकदारांना (Investors) 39250 टक्के इतका चांगला परतावा मिळाला आहे. येत्या पाच ते सात वर्षांत पतंजलीचा व्यवसाय अडीच पटीने वाढून एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज रामदेव बाबा यांनी व्यक्त केला आहे.

Ramdev Baba
मोदी सरकारच्या 'त्या' निर्णयाने बाबा रामदेव यांची कंपनी क्षणात मालामाल

कंपनी 4 नवीन IPO आणणार

रामदेव बाबा नुकतेच पत्रकार परिषदेत म्हणाले, 'पतंजली समूहाचा सध्याचा व्यवसाय सुमारे 40,000 कोटी रुपयांचा आहे. येत्या पाच ते सात वर्षांत समूहाचा व्यवसाय 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. पतंजली आयुर्वेद, पतंजली मेडिसिन, पतंजली लाईफस्टाईल आणि पतंजली वेलनेस या चार कंपन्या आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com