Passport Rule: पासपोर्टशिवाय विदेश यात्रा करु शकता? वाचा भारतातील नियम

Passport Update: लोक कोणत्याही अडथळ्याशिवाय देशांतर्गत प्रवास करु शकतात, परंतु परदेशात प्रवास करायचा झाल्यास त्यांना काही नियमांचे पालन करावे लागते.
Passport Rule
Passport RuleDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Passport Update: लोक कोणत्याही अडथळ्याशिवाय देशांतर्गत प्रवास करु शकतात, परंतु परदेशात प्रवास करायचा झाल्यास त्यांना काही नियमांचे पालन करावे लागते.

लोकांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज असते, पण काही लोकांना असाही प्रश्न पडतो की, ते पासपोर्टशिवाय परदेशात जाऊ शकतात? चला तर मग भारतातून परदेशात प्रवास करण्याचे काय नियम आहेत.

पासपोर्ट आवश्यक

परदेश प्रवासाबाबत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. अशा परिस्थितीत लोकांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. पासपोर्ट नसताना लोक दुसऱ्या देशात जाऊ शकत नाहीत.

तथापि, भारतातील (India) लोक पासपोर्टशिवायही काही देशांमध्ये प्रवास करु शकतात. भारतातून काही देशांमध्ये जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक नाही. तुम्हाला तुमच्या फोटो ओळखपत्रांच्या आधारे या देशांमध्ये प्रवास करण्याची परवानगी आहे. हे दोन देश भूतान आणि नेपाळ आहेत.

Passport Rule
Passport Rules: मोदी सरकारने बदलले नियम, आता पासपोर्ट मिळवणे आणखी होणार सोपे!

तुम्ही असा प्रवास करु शकता

भूतानला जाण्यासाठी तुम्ही मतदार ओळखपत्र घेऊन जाऊ शकता. त्याचवेळी, मुलांना त्यांचे जन्म प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक शाळा ओळखपत्र (आधारकार्ड) सोबत ठेवावे लागेल.

त्याचवेळी, जर तुम्हाला नेपाळला जायचे असेल, तर तुम्ही भारतातील सर्व प्रमुख विमानतळांवरुन काठमांडू, नेपाळला जाणारी हवाई सेवा घेऊ शकता.

नेपाळच्या (Nepal) एडवाइजरीनुसार, भारतीयांना फक्त त्यांचे भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपत्रे हवी आहेत. यासाठी ते मतदार ओळखपत्र किंवा आधारकार्ड दाखवू शकतात.

Passport Rule
Passports: दहा वर्षात 70,000 भारतीयांनी केले पासपोर्टचे आत्मसमर्पण; गोवा, पंजाब आघाडीवर

येथे व्हिसा आवश्यक नाही

भूतान आणि नेपाळ व्यतिरिक्त, असे काही देश आहेत जिथे पासपोर्ट आवश्यक आहे परंतु व्हिसा आवश्यक नाही. जगभरात एकूण 58 पर्यटन स्थळे आहेत जिथे तुम्ही व्हिसाशिवाय प्रवास करु शकता.

या देशांमध्ये मालदीव, मॉरिशस, थायलंड, मकाऊ, श्रीलंका, भूतान, नेपाळ, केनिया, म्यानमार, कतार, कंबोडिया, युगांडा, सेशेल्स, झिम्बाब्वे आणि इराण यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com