Common ITR Forms: कॉमन आयटीआर फॉर्म जारी करण्यासाठी संसदीय समितीचा अर्थ मंत्रालयाला सल्ला

Common ITR Forms: अर्थ मंत्रालयाशी संलग्न संसदीय समितीने मंत्रालयाला लवकरात लवकर एक कॉमन आयटीआर फॉर्म जारी करण्यास सांगितले आहे.
Union Ministry of Finance
Union Ministry of FinanceDainik Gomantak
Published on
Updated on

Common ITR Forms: अर्थ मंत्रालयाशी संलग्न संसदीय समितीने मंत्रालयाला लवकरात लवकर एक कॉमन आयटीआर फॉर्म जारी करण्यास सांगितले आहे.

समितीने करदात्यांसाठी आयकर रिटर्न भरणे सोपे करण्यास आणि बिगर व्यावसायिक करदात्यांना लवकरच कॉमन आयकर रिटर्न जारी करण्यास सांगितले आहे.

गेल्या वर्षीच, अर्थ मंत्रालयाने कॉमन आयटीआर फॉर्मसाठी प्रस्ताव आणला होता. विशेष म्हणजे, या संदर्भात सर्व संबंधितांकडून सूचनाही मागवल्या होत्या.

दरम्यान, संसदीय समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा यांनी यापूर्वीच आयकर विवरणपत्र भरताना करदात्यांना येणाऱ्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी CBDT ला आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सोपी करण्याचे आवाहन केले.

समितीने म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीचे पगार, रेंट, व्यवसायाचे उत्पन्न (Income) असेल तर तो चार्टर्ड अकाउंटंट किंवा तज्ञांच्या सल्ल्याशिवाय आयकर रिटर्न भरु शकत नाही.

दुसरीकडे, संसदीय समितीला दिलेल्या उत्तरात, मंत्रालयाने म्हटले आहे की कर अनुपालन सुलभ करण्यासाठी ते आयटीआरमध्ये (ITR) आधीच पगारात प्री-फिल्ड कर उपलब्ध करुन देत आहे. मालमत्तेचे उत्पन्न, बँकेचे व्याजाचे उत्पन्न, डिविडंड यांचाही प्री-फिल्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.

अर्थ मंत्रालयाने सांगितले की, जगातील बेस्ट प्रॅक्टिसच्या आधारावर, एक कॉमन ITR फॉर्म आणण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये ITR-7 वगळता सर्व ITR विलीन केले जात आहेत.

Union Ministry of Finance
ITR filing Last Date 2023: 31 जुलैपूर्वी आयटीआर भरा, नाहीतर 'या' समस्यांचा सामना करण्यासाठी तयार राहा

गेल्या वर्षी, अर्थ मंत्रालयाने सर्व करदात्यांसाठी कॉमन आयकर रिटर्न फॉर्मचा प्रस्ताव आणला होता. अर्थ मंत्रालयाने 15 डिसेंबर 2022 पर्यंत संबंधितांकडून सूचना मागवल्या होत्या.

असा अंदाज वर्तवला जात होता की, 2023-24 च्या अर्थसंकल्पात (Budget) कॉमन आयटीआर फॉर्म आणण्याची घोषणा केली जाऊ शकते. पण असे झाले नाही.

Union Ministry of Finance
ITR Notice: करदात्यांना धडाधड येताहेत नोटीस; या सूचना पाळा अन् संकट टाळा

तसेच, सध्या करदात्यांच्या विविध श्रेणींसाठी 7 प्रकारचे ITR फॉर्म उपलब्ध आहेत. पण अर्थ मंत्रालयाने आता सर्व करदात्यांना एकच ITR फॉर्म देण्याचा प्रस्ताव आणला होता. ITR-7 वगळता सर्व ITR फॉर्म विलीन करण्याचा प्रस्ताव आहे.

CBDT ने तेव्हा सांगितले होते की, ITR-1 आणि ITR-4 चालू राहतील, परंतु करदात्यांना कॉमन ITR द्वारे आयकर रिटर्न भरण्याचा पर्याय असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com