PACL Chit Fund Refund: PACL रिफंडबाबत मोठी बातमी, गुंतवणूकदारांना मिळाले 920 कोटी रुपये; तुम्हाला पैसे मिळाले की...

PACL Chit Fund Refund Update: तुमचे किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचे पैसे PACL मध्ये अडकले असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

PACL Chit Fund Refund Update: तुमचे किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचे पैसे PACL मध्ये अडकले असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 19 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आली आहे.

PCAL लिमिटेडच्या 19 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना 920 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. मात्र, या गुंतवणूकदारांचा कंपनीवर 17,000 कोटी रुपयांचा दावा आहे. सेबीने सोमवारी ही माहिती दिली.

60,000 कोटी रुपये उभे केले

कंपनीने शेती आणि रिअल इस्टेट (Real Estate) व्यवसायाच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळले. बेकायदेशीर सामूहिक गुंतवणूक योजनेंतर्गत 18 वर्षांमध्ये 60,000 कोटींहून अधिक निधी उभारण्यात आला.

निवृत्त न्यायमूर्ती आरएम लोढा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने टप्प्याटप्प्याने पीएसीएलच्या गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.

Money
Inflation Rate: महागाईवर आली मोठी अपडेट, RBI गव्हर्नरने व्यक्त केली ही अपेक्षा

सेबीने माहिती दिली

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत समितीने 19,61,690 अर्जदारांना 919.91 कोटी यशस्वीरित्या परत केले आहेत. त्यांची थकबाकी (मूल रक्कम) 17,000 कोटी रुपयांपर्यंत आहे.

समितीने फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूकदारांना (Investors) पीएसीएलकडून मिळालेली मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यास सांगितले होते, जेणेकरुन पडताळणीनंतर त्यांचे पैसे परत करता येतील. मूळ प्रमाणपत्रे स्वीकारण्याची तारीख 27 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 होती.

Money
WPI Inflation: महागाईपासून सामान्यांना दिलासा, खाद्यपदार्थावर दिली सूट

कंपनीचा व्यवसाय काय आहे?

पर्ल ग्रुप या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पीएसीएलने शेती आणि रिअल इस्टेट व्यवसायाच्या नावावर पैसा उभा केला.

SEBI ला आढळून आले की, कंपनीने 18 वर्षांच्या कालावधीत बेकायदेशीर सामूहिक गुंतवणूक योजना (CIS) द्वारे 60,000 कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला आहे.

सेबीने डिसेंबर 2015 मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात अयशस्वी झालेल्या संचालकांसह PACL आणि त्याच्या नऊ प्रवर्तकांच्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com