ऑनलाइन विम्याची वाढत आहे क्रेझ

लोक आता एजंट आणि सल्लागारांऐवजी टर्म लाइफ विमा (Term life insurance) उत्पादने ऑनलाइन (Online) खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.
Online Insurance Policy
Online Insurance PolicyDainik Gomantak
Published on
Updated on

डिजिटायझेशन असूनही 80 टक्क्यांहून अधिक विमा पॉलिसी (Insurance policy) घेणारे त्यांच्या पॉलिसी दस्तऐवजांच्या भौतिक प्रती ठेवण्यास प्राधान्य देतात. एका सर्वेक्षणात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. बॉम्बे मास्टर प्रिंटर्स असोसिएशन (BMPA) च्या सर्वेक्षणानुसार, सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये (GDP) विम्याचे योगदान गेल्या एका वर्षात झपाट्याने वाढले असल्याने खरेदीदारांना त्यांच्या गुंतवणुकीबद्दल सुरक्षित वाटणे देखील महत्त्वाचे आहे.'

सर्वेक्षण अहवालात असे म्हटले आहे की, विमा नियामकाने खरेदीदारांच्या हितासाठी कलम 4 (Act 4) पुनर्संचयित करण्याचा विचार करावा आणि पॉलिसी दस्तऐवजाच्या भौतिक प्रती लवकरात लवकर जारी कराव्यात. विमा पॉलिसी हा विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यातील करार असल्याने, सुमारे 82 टक्के खरेदीदारांनी डिजिटल (Digital) प्रतीपेक्षा भौतिक प्रतीला प्राधान्य दिले. या सर्वेक्षणात सुमारे 5,900 लोकांचा सल्ला घेण्यात आला.

Online Insurance Policy
बिटकॉइनच्या किंमतीत मोठी घसरण?

ऑनलाइन विमा खरेदी

देशात टर्म लाइफ (Term Life) विमा क्षेत्रात ऑनलाइन विक्रीला वेग आला आहे. लोक आता एजंट आणि सल्लागारांऐवजी 'टर्म लाइफ' विमा उत्पादने 'ऑनलाइन' खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. मॅक्स लाइफ इन्शुरन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे उपव्यवस्थापकीय संचालक व्ही विश्वानंद म्हणाले की, गेल्या आर्थिक वर्षात एकूण 'टर्म लाइफ' विम्यापैकी 12.5 टक्के भारतीय ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी केली होती.

विमा खरेदी करणाऱ्यांचे सरासरी वय

काही कंपन्यांसाठी ऑनलाइन पर्याय हा उत्पादने विकण्याचा एक महत्त्वाचा मार्ग बनला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात मॅक्स लाईफचा बाजार (Max Life's Market) हिस्सा 30 टक्क्यांच्या जवळपास होता. सध्या हा वाटाही सारखाच आहे, म्हणजे भारतातील तीनपैकी एक ऑनलाइन टर्म लाइफ इन्शुरन्स खरेदी मॅक्स लाइफकडून आहे. त्यांच्या प्रतिसादाच्या आधारावर काही नवीन योजना आणल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com