Online Gaming: कॅसिनोसह ऑनलाइन गेमिंगबाबत जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत होणार फैसला

GST Council Meeting: जीएसटी कौन्सिलच्या मागील बैठकीत ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोवर २८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Online Gaming
Online GamingDainik Gomantak

GST Council Meeting On Online Gaming:

GST कौन्सिल ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के GST लावण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करणार आहे.

आज (बुधवार), अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची व्हर्चुअल बैठक होणार आहे, ज्यामध्ये ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोवरील 28 टक्के जीएसटीवर प्रामुख्याने चर्चा केली जाईल.

जीएसटी लागू करण्याच्या निर्णयावर अंतिम निर्णय

कौन्सिलच्या मागील बैठकीत ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग (Horse Racing) आणि कॅसिनोवर (Casino) २८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

कौन्सिलच्या निर्णयानुसार, ऑनलाइन गेमिंगमधील प्रत्येक सट्ट्यावर २८ टक्के जीएसटी भरावा लागेल.

Online Gaming
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील दर स्थिर; दक्षिण गोव्यातील दरांमध्ये बदल

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना विरोध

कौन्सिलच्या या निर्णयाला ऑनलाइन गेमिंग कंपन्यांनी विरोध केला आहे. विशेषत: गेम ऑफ स्किलशी (Game of Skills) संबंधित कंपन्या याला कडाडून विरोध करत आहेत.

गेम ऑफ स्किलशी संबंधित 120 कंपन्यांनी अर्थ मंत्रालय आणि राज्यांच्या अर्थमंत्र्यांना 28 टक्के जीएसटी मागे घेण्याची विनंती केली आहे.

गेम ऑफ स्किलचे गेम ऑफ चान्स किंवा कॅसिनो असे वर्गीकरण करता येणार नाही, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे. सध्या देशात ४० कोटीहून अधिक ऑनलाइन गेमर्स आहेत.

Online Gaming
LPG Price: सिलिंडरच्या किमती घटल्या पण किती रुपयांनी? जाणून घ्या नव्या किंमती

मागील बैठकीत हा निर्णय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कौन्सिलच्या बैठकीत गेम ऑफ स्किलला 28 टक्क्यांवरून दिलासा मिळू शकतो, कारण इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय गेम ऑफ चान्समधून गेम ऑफ स्किलसाठी वेगळ्या जीएसटी दराच्या बाजूने आहे.

मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसटी कौन्सिलच्या मागील बैठकीत ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटीचा निर्णय सर्व राज्यांच्या सहमतीने घेण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com