Old Pension Scheme: जुन्या पेन्शनबाबत मोठा खुलासा, रघुराम राजन म्हणाले...

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजने (OPS) बाबत देशभरात विविध चर्चा सुरु आहेत. या सगळ्यामध्ये अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली जात आहे.
Raghuram Rajan on Old Pension Scheme
Raghuram Rajan on Old Pension SchemeDainik Gomantak

Raghuram Rajan on Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजने (OPS) बाबत देशभरात विविध चर्चा सुरु आहेत. या सगळ्यामध्ये अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली जात आहे. त्याचवेळी, अनेक राज्यांमध्ये, त्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला आहे.

नवीन आणि जुनी पेन्शन योजनेबद्दल, भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, सरकारी खर्च कमी होईल, परंतु भविष्यासाठी दायित्वे वाढतील.

मुलाखतीत ही मोठी माहिती दिली

याशिवाय, रघुराम राजन यांनी बँकांना (Bank) रिटेल कर्जावर जास्त झुकते माप देऊ नये, असा इशाराही दिला आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम व्यतिरिक्त, एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत राजन म्हणाले की, 'नवीन पेन्शन योजना स्वीकारणे योग्य आहे, कारण जुनी पेन्शन योजना खूप मोठी जबाबदारी बनली होती आणि सध्या ही राज्ये जुनी पेन्शन स्वीकारत आहेत.'

Raghuram Rajan on Old Pension Scheme
Old Pension Scheme: 'या' राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळाली भेट, जुनी पेन्शन योजना लागू करणार; CM ची घोषणा

राज्यांना निर्णय घ्यावा लागेल

राजन पुढे मुलाखतीत म्हणाले की, हे प्रत्येक राज्य सरकारने ठरवायचे असले तरी, या योजना समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभावीपणे लक्ष्य केल्या पाहिजेत, जेणेकरुन त्यांना लाभ मिळू शकेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com