Ola S1 Air चे प्री-बुकिंग ₹ 999 पासून सुरू; 31 जुलैपासून 10 हजार रूपयांनी महागणार

15 ऑगस्टपर्यंत बाजारात येणार
Ola S1 Air
Ola S1 Airgoogle image
Published on
Updated on

Ola Electric ने Ola S1 Air या इलेक्ट्रीक स्कूटरसाठी आज (22 जुलै) पासून प्री-बुकिंग सुरू केले. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून 999 रुपयांमध्ये ही बाईक बुक करता येईल. इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 1 लाख 09 हजार रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

ही सुरवातीची किंमत आहे. 31 जुलैपासून ई-स्कूटर्स 10 हजार रुपयांनी महागणार आहे. भारतीय बाजारपेठेत, Ola च्या या इलेक्ट्रिक स्कूटरची स्पर्धा Ather 450 S शी होणार आहे. जी 3 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे.

बेंगळुरूस्थित स्टार्टअप कंपनी ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, 'S1 Air च्या खरेदीसाठीची खरेदी विंडो 28 जुलै ते 30 जुलै या कालावधीत 1,09,999 रुपये (एक्स-शोरूम) च्या प्रारंभिक किमतीत उघडली जाईल.

प्रास्ताविक किमतीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी आत्ताच प्री बुक करा. यानंतर, 31 जुलैपासून, तुम्हाला ई-स्कूटरसाठी 1,19,999 रुपये (एक्स-शोरूम) द्यावे लागतील. त्याची डिलिव्हरी ऑगस्टमध्ये सुरू होईल.

Ola S1 Air
Tourists Ban on Dudhsagar Falls: दुधसागर धबधब्यावर पर्यटक, ट्रेकर्सना बंदी; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

इलेक्ट्रिक स्कूटरमधील सर्वात मोठा बदल म्हणजे त्याचे फ्रंट सस्पेन्शन. कंपनीने मोनो-शॉक ऐवजी फ्रंट टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन-शॉक अॅब्जॉर्बस दिले आहेत. ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच एका ट्विटमध्ये दावा केला आहे की S1 एअर इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी 5 लाख किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत झाली आहे.

रेंज, बॅटरी आणि पॉवर

कंपनीच्या मते, Ola S1 Air ला परफॉर्मन्ससाठी Ola हायपर ड्राइव्ह मोटर देण्यात आली आहे, जी 4.5 kWh हब मोटर आहे. ही मोटर 11.3 hp ची कमाल पॉवर आणि 58 nm टॉर्क जनरेट करते.

मोटरला उर्जा देण्यासाठी, 3 kWh बॅटरी पॅक जोडलेला आहे. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज झाली की इलेक्ट्रिक स्कूटर 125 किमी चालते. ई-स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे.

Ola S1 Air
Modi Government on OPS: मोदी सरकारची कमाल, आता जुन्या पेन्शनचा मिळणार लाभ; कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी!

S1 Air one LED हेडलॅम्प, 7 इंच TFT स्क्रीन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, रिव्हर्स मोड, OTA अपडेट्स, रिमोट बूट लॉक/अनलॉक आणि म्युझिक प्लेबॅक यासारखी फीचर्स दिली आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे 3 रायडिंग मोड आहेत.

कंपनी 15 ऑगस्ट रोजी या इलेक्ट्रिक बाइक्सचे अनावरण करू शकते. ओला इलेक्ट्रिकने 9 फेब्रुवारी रोजी S1 Air सोबत Ola S1 आणि S1 Pro चे नवीन प्रकार अनावरण केले. ओला इलेक्ट्रिक स्कूटर्स आता भारतीय बाजारात 6 पर्यायांसह उपलब्ध आहेत. यासोबतच पहिल्यांदाच 5 इलेक्ट्रिक बाइक्सची झलकही दाखवण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com