कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झपाट्याने घसरण

युएइ उत्पादन वाढवण्याच्या बाजूने असल्याने कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे असे अमेरिकेतील युएइच्या राजदूताने म्हंटले आहे.
oil
oil Dainik Gomantak
Published on
Updated on

कच्च्या तेलाच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. खर तर किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी UAEतेल उत्पादन वाढवण्याच्या बाजूने असल्याच्या बातम्या मीडियामध्ये सुरू झाल्या आहेत. यासह आज तेलाच्या किमती कमाल 18 टक्क्यांनी घसरल्या असून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 113 डॉलरच्या खाली आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 139 डॉलर पातळीवर पोहोचले होते. किमतीची ही पातळी गेल्या 14 वर्षातील सर्वोच्च पातळी आहे. रशिया युक्रेनमध्ये (Russia Ukraine Crisis) सुरू असलेल्या युद्धामुळे किमती एका आठवड्यात 30 टक्क्याहून अधिक वाढल्या आहेत.

* किंमती का घसरल्या

एका वृतानुसार युएइच्या राजदूताने माहिती दिली आहे की, युएइ उत्पादन वाढवण्याच्या बाजूने आहे. त्याच वेळी, रॉयटर्सने बाजारात तज्ञाशी बोलून लिहिले आहे की युएइ (UAE) ताबडतोब 8 लाख बॅरल तेलाचे उत्पादन वाढवू शकते. जे रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे कमी झालेल्या पुरवठ्याच्या सातव्या भागाची भरपाई करेल. त्याचबरोबर आगामी काळात इराणकडून होणार पुरवठाही वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील दबाव कमी होण्याचा अंदाज आहे. ही बाब लक्षात घेता तेलाचे भाव अजून कमी होण्याची शक्यता आहे. तेल उत्पादक देशानाही अशी भीती वाटते की, तेलाच्या किमतीत अशी उडी घेतल्याने मागणीवर नकारात्मक परिणाम होईल, तर महागड्या तेलामुळे अर्थव्यवस्था (Economics) मंदावली तर कच्च्या तेलाच्या किंमती आणखी घसरतील. त्यामुळे युएइ देश तेल उत्पादन वाढाऊ शकतात.

oil
उन्हाळ्यात थंडावा; फक्त 400 रुपयात एसी

तेलाच्या किमती 12 टक्यांनी घसरल्या आहेत. त्यात आज प्रती बॅरल 15 डॉलर पेक्षा जास्त घट झाली आहे. मागील सत्रात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल सुमारे 128 डॉलर वर बंद झाले होते. आजच्या व्यवहारात ब्रेंट 105 डॉलर च्या पातळीवर खाली आला होता. म्हणजेच प्रती बॅरल 23 डॉलरची कपात होती. त्याचा वेळी WIT क्रूड 11 टक्क्याहून अधिक घसरून प्रती बॅरल 110 डॉलर च्या खाली पोहोचले. याआधी कच्च्या तेलात मोठी उसळी आली होती आणि गेल्या 6 दिवसांत कच्चा तेलात 28 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com