Contract Employees Regularization: सरकारची मोठी घोषणा, कंत्राटी कर्मचारी होणार नियमित

Contract Employees Regularization: कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे.
Employees
EmployeesDainik gomantak
Published on
Updated on

Regularization News: कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. या दिवाळीत सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता सरकार कंत्राटी पद्धत संपवत आहे, म्हणजेच आता सर्व कर्मचारी नियमित होणार आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सरकारने मोठी घोषणा केली

खरे तर, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी त्यांच्या वाढदिवसापूर्वी राज्यातील कंत्राटी पद्धत संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. राज्यातील जनतेला दिवाळीची मोठी भेट देत सरकारने आता राज्यात कोणीही कंत्राटी पद्धतीने काम करणार नाही, अशी घोषणा केली आहे. याअंतर्गत सध्या कार्यरत असलेले सर्व कंत्राटी कर्मचारी (Employees) नियमित करण्यात येणार आहेत.

Employees
Indian Railways: प्रवाशांचे बल्ले-बल्ले, रेल्वेने केली मोठी घोषणा

57 हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी नियमित होणार

दिवाळीपूर्वी घोषणा करताना नवीन पटनायक म्हणाले की, ओडिशातून (Odisha) कंत्राटी नियुक्ती पद्धत कायमची रद्द करण्यात आली आहे. या घोषणेनंतर राज्यातील विविध शासकीय संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या 57 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचारी करण्यात येणार आहे. यामुळे राज्य सरकारला 1300 कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका बसणार आहे.

Employees
Indian Railways: दिवाळीत प्रवाशांचे बल्ले-बल्ले, रेल्वेत मिळणार मोफत जेवण!

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने मोठा निर्णय घेतला

मुख्य म्हणजे, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून या संदर्भातील औपचारिक पत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांनी रोषणाई केली

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राज्यातील विद्यमान कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या या घोषणेनंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com