IRCTC Ticket Booking: आता पैसे न भरताही करा तिकीट बुकिंग; IRCTC ने सुरू केलेली ही नवीन सुविधा नक्की जाणून घ्या

Paytm Postpaid Buy Now Pay Later: ही सुविधा पेटीएमतर्फे वापरण्यात येणार आहे.
IRCTC Ticket Booking| IRCTC New Service | Paytm Postpaid Buy Now Pay Later
IRCTC Ticket Booking| IRCTC New Service | Paytm Postpaid Buy Now Pay LaterDainik Gomantak

Paytm Postpaid Buy Now Pay Later: रेल्वेने कुठेही प्रवास करताना आपण सगळ्यात आधी जर कोणती गोष्ट करत असू तर ती म्हणजे तिकीट बुकिंग. अनेकदा तिकीट बुकिंग करताना पैसे कमी पडण्याचा अनुभव तुम्हाला आला असेल. याचसंदर्भात IRCTC ने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्ही पैशांशिवायही त्वरित तिकीट बुकिंग करू शकणार आहात.

IRCTC Ticket Booking| IRCTC New Service | Paytm Postpaid Buy Now Pay Later
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किरकोळ घट; जाणून घ्या आजचे इंधनाचे दर

IRCTC आणि पेटीएम पोस्टपेडतर्फे नवीन सुविधा

ही सुविधा पेटीएमतर्फे वापरण्यात येणार आहे. पेटीएमवर कोणतेही पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. 'Buy Now, Pay Later' च्या माध्यमातून हे शक्य आहे. IRCTC अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या अॅपने आता पेटीएम पोस्टपेड सुरू केले आहे. यासह, पेटीएम वापरकर्ते तिकीट बुक करण्यासाठी Buy Now, Pay Later ही सुविधा वापरू शकतात.

तिकिट बुक करण्यासाठी तुम्ही पेटीएम पोस्टपेड वापरत असल्यास, तुम्ही 30 दिवसांसाठी 60,000 रुपये क्रेडिट म्हणून वापरू शकता. याद्वारे तुम्ही त्वरित पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करू शकता. तिकिटाचे पैसे तुम्ही नंतर भरू शकता.

पेटीएम पोस्टपेडसह रेल्वे तिकिटे कसे बुक करायचे?

1. तुमच्या मोबाईलवर IRCTC अॅप डाउनलोड करून लॉग इन करा.

2. तिकीट बुक करण्यासाठी तुमच्या प्रवासाचे तपशील भरा. यामध्ये स्टेशनच्या माहितीसह तारीखही टाकावी लागणार आहे.

3. नंतर ट्रेन निवडा आणि तिकीट बुक करण्यासाठी पुढे जा.

4. तुम्ही पेमेंट विंडोवर पोहोचल्यावर, तुम्हाला Buy Now, Pay Later हा पर्याय निवडायचा आहे.

5. त्यानंतर पेटीएम पोस्टपेड वर क्लिक करा आणि तुमचे पेटीएम लॉगिन तपशील भरून पुढे जा.

6. संबंधित गोपनीय माहिती भरल्यानंतर, तुम्हाला एक वेरिफिकेशन एसएमएस येईल.

7. बुकिंग निश्चित करण्यासाठी OTP भरा.

अशाप्रकारे तुमचे तिकीट पैसे न भरता त्वरित निश्चित होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com