Pay Tax With QR Code in Chennai: देशभरात ई-पेमेंट सेवा झपाट्याने वाढत आहे. यातच आता, पाणी किंवा मालमत्ता कर भरणे किंवा पाणी पुरवठा न झाल्याबद्दल तक्रार करणे सोपे होणार आहे.
तुम्हाला फक्त तुमच्या घरी पेस्ट केलेला QR कोड स्कॅन करायचा आहे. ई-गव्हर्नन्स आणि जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करुन क्यूआर कोडद्वारे नागरी सेवा लागू करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे, असे मेट्रोवॉटरच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन (GCC) आणि मेट्रोवॉटरचे मिळून 80 लाख ग्राहक आहेत, ज्यांच्या सर्वांच्या घरी QR कोड पेस्ट केला जाईल.
सध्या, प्रत्येक वेळी ग्राहकाला (Customer) जीसीसी किंवा मेट्रोवॉटरकडे तक्रार पाठवायची असेल, तेव्हा त्याला/तिला संबंधित अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक शोधावा लागतो किंवा कार्यालयात प्रत्यक्ष भेट द्यावी लागते.
हे दोन्ही कठीण आहे, विशेषतः उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात. मात्र, या नव्या सुविधेमुळे हे टाळण्यास मदत होईल, असे मेट्रोवॉटरच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दुसरीकडे, कॉर्पोरेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सिस्टममधील त्रुटी शोधण्यासाठी आणि त्या दुरुस्त करण्यासाठी गेल्या काही महिन्यांत ट्रायल रन घेण्यात आल्या आहेत.
नवीन प्रणाली परिपूर्ण आणि सुव्यवस्थित झाल्यानंतरच सरकारने QR कोड वापरण्याबाबत घोषणा केली.
तसेच, जीसीसी आणि मेट्रोवॉटर ही यंत्रणा शहराच्या हद्दीत कार्यान्वित करेल. त्याचबरोबर, महापालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा विभाग नगरपालिका आणि ग्रामीण भागात ती कार्यान्वित करतील, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
त्याचबरोबर, नवीन प्रणाली वापरुन मिळू शकणार्या काही महत्त्वाच्या सुविधांमध्ये मालमत्ता आणि पाणी कर भरणे, जन्म-मृत्यू दाखले मिळवणे, सामान्य तक्रारी नोंदवणे, प्रकल्पांना मान्यता देणे, व्यापार परवाना मिळवणे, सरकारने (Government) जारी केलेल्या विविध सूचना आणि माहिती, कचरा संकलन, GCC मर्यादेतील उद्याने आणि खेळाच्या क्षेत्रांबद्दल तक्रारी. हा प्रकल्प लवकरच सुरु होणार आहे.
शिवाय, निवासी भागाव्यतरिक्त, QR कोड बस स्थानके, उद्याने, स्मशानभूमी, क्रीडांगणे, कल्याण केंद्रे आणि सार्वजनिक शौचालये येथे देखील पेस्ट केले जातील, ज्याचा उद्देश या ठिकाणी परिस्थिती सुधारण्यासाठी आणि लोकांना त्यांच्या सूचना देण्यास सक्षम करणे आहे.
त्याचबरोबर, एका केंद्रीकृत नियंत्रण केंद्रावर तक्रारी प्राप्त केल्या जातील आणि संबंधित अधिकार्यांना निवारणासाठी पाठवल्या जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.