रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भारतात डिजिटल चलन (Digital Currency) सुरू करण्याची तयारी करत आहे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे. केंद्रीय बँक टप्प्याटप्प्याने स्वतःचे डिजिटल चलन सादर करण्याच्या धोरणावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Now RBI will launch digital currency)
योजनेनुसार आरबीआय प्रायोगिक तत्त्वावर घाऊक आणि किरकोळ क्षेत्रात डिजिटल चलन सादर करण्याची तयारी करत आहे. याविषयावर बोलताना टी रविशंकर म्हणाले की सरकारी हमीशिवाय डिजिटल चलनात अस्थिरतेच्या परिणामापासून लोकांना वाचविण्याची गरज आहे. त्याचा संकेत बिटकॉइन सारख्या अनधिकृत डिजिटल चलनाचा होता.तसेच की जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका तो सुरू करण्याच्या दिशेने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, शंकर म्हणाले की, काही डिजिटल चलनांमध्ये कोणतीही सरकारी हमी न मिळालेल्या ग्राहकांना भयानक पातळीवरील अस्थिरतेपासून संरक्षण देण्याची गरज आहे. ‘विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी’ च्या ऑनलाइन कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.आरबीआय स्वतःचे डिजिटल चलन टप्प्याटप्प्याने राबविण्याच्या धोरणावर काम करीत आहे आणि बँकिंग प्रणाली आणि आर्थिक धोरणावर कोणताही परिणाम होणार नाही अशा पद्धतीने याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. असे त्यांनी सपष्ट केले आहे.
ही योजना राबवताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायद्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या तरतुदींना चलन प्रत्यक्षात डोळ्यासमोर ठेवूनच या कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे तसेच यासाठी नाणे कायदा, विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा (फेमा) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातही बदल करण्याची गरजही डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी बोलून दाखवली आहे.
एकूणच काय तर बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी यांना टक्कर देण्यासाठी लवकरच देशात आरबीआय लवकरच आपले दहिटल नाणे आणणार हे नक्की.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.