Nokia ने गेल्या महिन्यात Nokia C12 आणि Nokia C12 Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केले होते. कंपनी आता आणखी एक सी-सीरीज हँडसेट - Nokia C12 Plus लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नोकियाने सोशल मीडिया (Social Media) चॅनेलवर आगामी लॉन्चसाठी टीझर शेअर करणे अद्याप सुरु केलेले नाही, परंतु कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर एक मायक्रो-साइट लॉन्च झाली.
दरम्यान, Nokia C12 Plus लॉन्च मायक्रो-साइटच्या माध्यमातून प्रारंभिक किंमतीसह डिव्हाइसचे स्पेसिफिकेशन माहित झाले आहे. मायक्रो-साइटनुसार, नोकिया सी12 प्लसची इंडियामधील किंमत 7999 रुपयांपासून सुरु होईल. स्मार्टफोनच्या (Smartphones) स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल अधिक जाणून घेऊया...
आगामी सी-सीरीज स्मार्टफोनमध्ये HD+ (720×1520 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि वॉटरड्रॉप नॉचसह 6.3-इंचाचा डिस्प्ले असेल. त्याचबरोबर, Nokia C12 Plus मध्ये 1.6GHz पीक फ्रिक्वेन्सीसह ऑक्टा-कोर UniSoC प्रोसेसर असेल.
स्मार्टफोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज दिले जाईल. विशेष म्हणजे, हे Android 12 (Go Edition) सह प्री-लोड केले जाईल. स्मार्टफोन एलईडी फ्लॅशसह 8MP रियर कॅमेरासह सुसज्ज असेल.
Nokia C12 Plus मध्ये 5MP फ्रंट कॅमेरा असेल. यात 4000mAh बॅटरी असेल. हँडसेटमध्ये चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी मायक्रो-यूएसबी पोर्ट असेल.
Nokia C12 Plus मध्ये एक डेडिकेटेड microSD कार्ड स्लॉट मिळू शकतो. हे ड्युअल नॅनो सिम कार्डला सपोर्ट करेल आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक देखील असेल.
हँडसेट WiFi 802.11 b/g/n आणि ब्लूटूथ 5.2 ला सपोर्ट करेल. Nokia C12 Plus लाइट मिंट, चारकोल आणि डार्क सायन कलर पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.
सूचीवरुन कळते की, नोकिया सी12 प्लस भारतात 7,999 रुपयांपासून सुरु होईल. तथापि, Nokia C12 Pro 2GB + 64GB वेरिएंटची किंमत 6999 रुपये आहे. वेबसाइटनुसार, Nokia C12 Plus India ची किंमत 7999 रुपयांपासून सुरु होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.